राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच मराठी भाषा अनिवार्य करणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.
राज्यातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य करणार असल्याचे अजित पवार यांनी बारामती येथे सांगितले. महाविकास आघाडीमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी बारामती शहरातून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर झालेल्या सभेमध्ये अजित पवारांनी सत्काराला उत्तर दिले. त्यावेळी, मराठी भाषेबद्दल अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी, मंत्रिमंडळात लवकरच एक विषय आणणार आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या शाळा असतील, उर्दू असतील, इंग्रजी असतील, हिंदी असतील, मराठी असतील. तिथे पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करणार.”
ते पुढे म्हणाले, की तुम्ही महाराष्ट्रात राहताय. महाराष्ट्रातील प्रत्येक मुला-मुलीला मराठी लिहता, वाचता अन् बोलता आलं पाहिजे. एकदा का मराठी आलं, की हिंदीही लिहिता वाचता बोलता येईल, असेही पवार यांनी सांगितले.
COMMENTS