राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांकडे वाढीव मुदत मागण्याचे पत्र दिले होते. राज्यपालांनी मात्र मुदत वाढवून दिली

नाणार रिफायनरी… आता हे अति झाले!
हिंदू देवांवर विधान केल्याप्रकरणी दलित प्राध्यापकाला जबर मारहाण
स्टेमी प्रकल्पः ह्रदय रुग्णांवर पहिल्या तासात उपचार शक्य

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांकडे वाढीव मुदत मागण्याचे पत्र दिले होते. राज्यपालांनी मात्र मुदत वाढवून दिली नाही आणि केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली.
राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला यासंबंधीचं पत्र पाठवले होते. त्यानंतर राष्ट्रपतींनी राज्यपालांच्या शिफारसीनुसार निर्णय घेऊन, लगेचच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
राष्ट्रपती राजवट लागू असली तरी एखाद्या पक्षाने पुरेसे संख्याबळ दाखवल्यास त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवली जाऊ शकते.
भाजपनंतर शिवसेनाही राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करू शकली नव्हती. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेस पाचारण केलं होतं. पण राष्ट्रवादीनेही सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दर्शवल्याने राज्यपालांनी केंद्राकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती.

सरकारस्थापनेसाठी शिवसेनेला पुरेसा वेळ दिला नाही, असा आरोप करत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0