१०वी-१२वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

१०वी-१२वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर कर

१२वीच्या निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय
१२वीचा निकाल आज दुपारी ४ वाजता जाहीर होणार
जेईई, एनईईटी पुढे ढकला; विरोधक ठाम

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, १५ मार्च २०२२ तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवारी ४ मार्च २०२२ पासून सुरू होत असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.

या संदर्भातील सविस्तर विषयनिहाय दिनांक आणि वेळ याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.mahasscboard.in यावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0