१२ आमदारांना निवडणूक आयोगाचा दिलासा

१२ आमदारांना निवडणूक आयोगाचा दिलासा

महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याने निळंबीत करण्यात आलेल्या १२ आमदारांना निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यास परवानगी दिली आहे.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याने निळंबीत करण्यात आलेल्या १२ आमदारांना निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यास परवानगी दिली आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक समोरा-समोर आले होते. विधानसभा अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली होती. त्यामुळे भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते.

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राज्यात पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या ४ ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणूकीत भाजपाचे निलंबित बारा आमदार देखील मतदान करु शकणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधिमंडळ प्रशासनाला भाजपाच्या निलंबित बारा सदस्यांसाठी मुंबईतील विधान भवनाच्या परिसराबाहेर मतदानासाठी स्वतंत्र बूथ स्टेशनची तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत.

निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार २२ सप्टेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. हा अर्ज महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यावा लागणार आहे. आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी २३ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता मुंबईत होणार आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर आहे. ४ ऑक्टोबर रोजी मतदान होईत तसेच त्याच दिवशी मतमोजणी देखील होईल.

इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशनावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावाच्या वेळी भाजप सदस्यांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

राज्यसभा सदस्य असणारे राजीव सातव यांचे १६ मे रोजी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी मतदान हॉट आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसने रजनी पाटील यांचं नाव जाहीर केले आहे. भाजपाकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

COMMENTS