न्यूझीलंडनंतर, इंग्लंडचीही पाकिस्तानातून माघार

न्यूझीलंडनंतर, इंग्लंडचीही पाकिस्तानातून माघार

दोनच दिवसांपूर्वी न्यूझीलडंने माघार घेतल्यानंतर इंग्लंडनेही सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचे पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये मर्यादित षटकांचे सामने खेळणार होते.

टॅटूवाला विराट
इंग्लंडचा भारत दौराः विजयाच्या अपेक्षा वाढल्या
दंतकथेतील राजाने केला प्राक्तनाचा स्वीकार!

दोनच दिवसांपूर्वी न्यूझीलडंने माघार घेतल्यानंतर इंग्लंडनेही सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचे पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये मर्यादित षटकांचे सामने खेळणार होते.

दोनच दिवसांपूर्वी न्यूझीलडंने माघार घेतल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने लवकरच पाकिस्तान दौऱ्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले होते. सोमवारी त्यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड संघाने शुक्रवारी पाकिस्तान दौऱ्यातून अचानक माघार घेतली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी काही तास न्यूझीलंडने सामन्यात खेळण्यास नकार दिला.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू संतापले आहेत. न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा शेवटच्या क्षणी रद्द झाल्याने निराश झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी इंग्लंडनेही पाकिस्तानचा दौरा रद्द केल्यावर संतप्त प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, ”पाश्चात्य गट एकवटला आहे असे दिसते आणि आमच्या संघाचे मुख्य लक्ष्य आता तीन संघांना पराभूत करणे आहे.” राजा म्हणाले, “याआधी आमचा शेजारी भारत हा एक संघ आमच्या निशाण्यावर होता, आता यात न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन संघ जोडले गेले आहेत.” राजा यांनी एक ट्वीटही केले. त्यात ते म्हणतात, ”आम्ही इंग्लंडमुळे निराश आहोत, त्यांनी महत्त्वाच्या क्षणी दिलेल्या वचनाचे पालन केले नाही. यातूनही आपण नक्कीच बाहेर पडू. पाकिस्तान क्रिकेट जगातील सर्वोत्तम संघ होण्यासाठी हा एक वेक-अप कॉल आहे, जेणेकरून उर्वरित संघ कोणतेही निमित्त न करता आमच्यासोबत खेळण्यासाठी रांगा लावतील.”

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरही भडकला आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) हे समजून घेतले पाहिजे की कोणीही त्यांच्याबाजूने भूमिका घेणार नाही आणि त्यांना स्वतःची भूमिका घ्यावी लागेल. जर मी पीसीबी प्रमुख असतो तर आगामी काळात इंग्लंड आणि न्यूझीलंड दौऱ्यावर गेलो नसता असे शोएब अख्तरने म्हटले आहे.

अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो म्हणतो, “तुम्ही आमच्या संपूर्ण देशाची प्रतिमा खराब करत आहात. तुम्हाला हे दाखवायचे आहे की आमचे सैन्य आणि बुद्धिमत्ता तुमचे संरक्षण करू शकत नाही. जर मी पीसीबी प्रमुख असतो, तर मी येत्या काळात इंग्लंड आणि न्यूझीलंड दौऱ्यावर गेलो नसतो आणि केवळ सुरक्षा धोक्यांचा हवाला दिला असता. ”

अख्तरने म्हंटले आहे, “टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध आहे, पण २६ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध मोठा सामना होईल. न्यूझीलंडला हरवण्यासाठी संपूर्ण संघाने एकत्र काम केले पाहिजे. पहिल्यांदा पीसीबीने आपली निवड निश्चित करावी आणि संघातील त्या तीन-चार मुलांना स्थान द्यावे जे बाहेर आहेत. राग व्यक्त करण्याची ही योग्य वेळ असेल, पाकिस्तान संघाला आता हेच करावे लागेल. पाकिस्तानने यापेक्षा वाईट काळ पाहिला आहे, आम्ही पुन्हा परत येऊ. विश्वचषक जिंकून आम्ही याचा बदला घेऊ. ”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0