नवी दिल्ली : सुदानची राजधानी खार्टुम शहरातील बाहरी भागातल्या एका सिरॅमिक कारखान्यात गँस टँकरचा स्फोट झाल्याने २३ कर्मचारी ठार झाले असून त्यात १८ भारती
नवी दिल्ली : सुदानची राजधानी खार्टुम शहरातील बाहरी भागातल्या एका सिरॅमिक कारखान्यात गँस टँकरचा स्फोट झाल्याने २३ कर्मचारी ठार झाले असून त्यात १८ भारतीयांचा समावेश आहे. तर ३४ जखमी भारतीयांवर उपचार सुरू आहेत. हा स्फोट इतका जबरदस्त होता की टँकरचे पूर्णपणे तुकडे-तुकडे झाले आणि लागलेल्या आगीत संपूर्ण कारखाना बेचिराख झाला. या दुर्घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटानंतर लोक सैरावैरा धावत असल्याचे व मदत मागताना दिसत होते.
या दुर्घटनेत १८ भारतीय ठार झाल्याची माहिती भारतीय दुतावासाने दिली असून हा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेतील मृतांची यादी दुतावासाने जाहीर केली असून त्यामध्ये राजस्थान, दिल्ली, उ. प्रदेश, हरयाणा व तमिळनाडूमधील भारतीय नागरिक आहेत.
मूळ बातमी
COMMENTS