हिंगणघाट पीडितेचा संघर्ष अखेर संपला

हिंगणघाट पीडितेचा संघर्ष अखेर संपला

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सात दिवसाच्या झुंजीनंतर अखेर सोमवारी सकाळी मृत्यू झाला. गेल्या सोमवारी महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या या तरुणीवर विक

‘आम्ही सगळे जेएनयू’ असे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे
विंबल्डनविना जुलै महिना
भरकटलेला ‘आप’ उजव्या वाटेवर

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सात दिवसाच्या झुंजीनंतर अखेर सोमवारी सकाळी मृत्यू झाला. गेल्या सोमवारी महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या या तरुणीवर विकेश नगराळे याने पेट्रोल टाकले होते व तिला पेटवून दिले होते. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या तरुणीला नागपूरमधील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते आणि तेथे तिच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे विशेष पथक नेमले होते. त्यांच्या देखरेखीखाली गेले ७ दिवस तरुणीवर उपचार सुरू होते.

रविवारी मध्यरात्रीपासून मात्र या तरुणीची प्रकृती खालावत गेली, तिला हृदयविकाराचे दोन झटके आले पण नंतर ती उपचारांना प्रतिसाद देऊ शकली नाही. अखेर पहाटे सातच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

सोमवारी संध्याकाळी तिच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. राज्य सरकारच्या वतीने पीडितेच्या कुटुंबियांना १० लाख रु.ची आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

आरोपीला दया माया दाखवली जाणार नाही

दरम्यान हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला कोणतीही दया माया दाखवली जाणार नाही, या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल व त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध करून त्याला फासावर लटकवू असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. आम्ही या प्रकरणाचा पूर्ण पाठपुरावा करू व अशी कृत्य पुन्हा होऊ नये यासाठी कडक कायदा करू असेही ते म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0