कोरोना महासाथीत २३ लाख रोजगार बुडाले

कोरोना महासाथीत २३ लाख रोजगार बुडाले

नवी दिल्लीः कोरोना महासाथीत गेल्या वर्षी लावलेल्या लॉकडाउनमध्ये ९ क्षेत्रातील २३ लाख रोजगार बुडाले. हे रोजगार एकूण रोजगाराच्या ७.५ टक्के इतके आहेत. ही

आरोग्य विभागाच्या १०० टक्के पदभरतीला मान्यता
‘अग्निपथ’ विरोधाचे लोण ७ राज्यात पसरले
रोजगारनिर्मितीत समाजमनाचा अभाव

नवी दिल्लीः कोरोना महासाथीत गेल्या वर्षी लावलेल्या लॉकडाउनमध्ये ९ क्षेत्रातील २३ लाख रोजगार बुडाले. हे रोजगार एकूण रोजगाराच्या ७.५ टक्के इतके आहेत. ही ९ क्षेत्रे आयटी/बीपीओ, वित्तीय संस्था, कारखानदारी, बांधकाम, शिक्षण व व्यापाराशी संबंधित आहेत. या सर्व क्षेत्रांचे लॉकडाउनच्या काळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सोमवारी सरकारने संसदेत ९ क्षेत्रातील २३ लाख रोजगार गेल्याची माहिती दिली. मार्च २०२०पर्यंत या ९ क्षेत्रांत ३०७.८ लाख व्यक्ती कार्यरत होत्या. पण लॉकडाउन लागल्यानंतर १ जुलै २०२०मध्ये ही आकडेवारी २८४.८ लाख इतकी खाली आहे.

इंडियन एक्स्प्रेसनुसार मार्च २०२० ते १ जुलै २०२० या काळात कारखानदारी क्षेत्रात १४.२ जणांच्या नोकर्या गेल्या. तर बांधकाम क्षेत्रात या काळात १ लाख, व्यापार व शैक्षणिक क्षेत्रांत अनुक्रमे १.८ लाख व २.८ लाख रोजगार गेले.

वित्तीय सेवा क्षेत्रात ०.४ टक्के नोकर्या व आयटी/बीपीओ क्षेत्रात १ लाखाहून अधिक जणांच्या नोकर्या गेल्या.

आकडेवारीनुसार ९ क्षेत्रात ७.४४ टक्के महिला श्रमिकांचे रोजगार गेले तर पुरुषांचे ७.४८ टक्के रोजगार गेले.

लॉकडाऊनच्या काळात कारखानदारी क्षेत्रांत महिला श्रमिकांची संख्या २६.७ लाखापासून २३.३ लाख इतकी खाली आली. तर उत्पादन क्षेत्रात पुरुषांची संख्या ९८.७ लाखाहून ८७.९ लाख इतकी खाली आली. बांधकाम क्षेत्रात महिलांची संख्या १.८ लाखाहून १.५ लाख अशी तर पुरुष श्रमिकांची संख्या ५.८ लाखाहून ५.१ लाख इतकी खाली आली.

व्यापारमध्ये महिलांचा रोजगार ४.५ लाखाहून ४ लाखावर तर पुरुषांचा रोजगार १६.१ लाखाहून १४.८ लाख इतका खाली आला.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0