दिव्यांग शालेय कर्मचाऱ्यांना ७वा वेतन आयोग

दिव्यांग शालेय कर्मचाऱ्यांना ७वा वेतन आयोग

मुंबई: सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित  शाळेतील ४ हजार ८९९ शिक्षक आणि ६ हजार १५९ शिक्षकेतर  कर्मचारी अशा एकूण ११ हजार ५८ कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.

गेल्या महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध केला.

सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शासन मान्य व अनुदान प्राप्त दिव्यांग निवासी, अनिवासी, विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहे चालविण्यात येतात. या सर्व शाळांमधील ११ हजार ५८ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती.

COMMENTS