५ ऑगस्टनंतर काश्मीरमधील जनजीवन

५ ऑगस्टनंतर काश्मीरमधील जनजीवन

श्रीनगर : संसदेत ५ ऑगस्ट रोजी जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द झाल्यापासून राज्यातील परिस्थिती अद्यापही अशांत असून गेले २५ दिवस या रा

अब्दुल्लांविरोधातील देशद्रोहाची याचिका रद्द
काश्मीर प्रश्न राजकीय नव्हे, राजनैतिक!
जम्मू व काश्मीरमध्ये कलम ३११ची अंमलबजावणी

श्रीनगर : संसदेत ५ ऑगस्ट रोजी जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द झाल्यापासून राज्यातील परिस्थिती अद्यापही अशांत असून गेले २५ दिवस या राज्यातील नागरिकांचा उर्वरित जगाशी संपर्क तुटला आहे. खोऱ्यात लँडलाईन सेवा सुरू करण्यात आली असली तरी इंटरनेट व मोबाइल सेवा अद्यापही बंद आहे.

गेल्या २५ दिवसांत या राज्यात सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी नागरिकांची तीव्र निदर्शने झाली. निमलष्करी दल, पोलिसांशी चकमकीही घडून आल्या. पेलेट गनचा वापर केल्याने शेकडो नागरिक घायाळ झाल्याचीही वृत्ते प्रसिद्ध झालेली आहेत.

मुझमील भट हे श्रीनगर येथील छायाचित्रकार असून ५ ऑगस्ट रोजी राज्यसभेत ३७० कलम रद्द केल्याच्या निर्णयानंतर राजधानी श्रीनगरमधील गेल्या तीन आठवड्यातील परिस्थिती त्यांनी आपल्या लेन्सने टिपली आहे.

१.५ ऑगस्ट रोजी श्रीनगरमधील लाल चौक परिसरातील माईसुमा येथे सीआरपीएफची एक बटालियन तैनात करण्यात आली. या तुकडीला मार्गदर्शन करताना एक अधिकारी.

५ ऑगस्ट रोजी श्रीनगरमधील लाल चौक परिसरातील माईसुमा येथे सीआरपीएफची एक बटालियन तैनात करण्यात आली. या तुकडीला मार्गदर्शन करताना एक अधिकारी.

५ ऑगस्टला पर्यटक व परप्रांतीयांनी खोरे सोडून जाण्यास सुरवात केली.

५ ऑगस्टला पर्यटक व परप्रांतीयांनी खोरे सोडून जाण्यास सुरवात केली.

३.९ ऑगस्टला श्रीनगरमध्ये पोलिसांनी पेलेट गनचा वापर केला. त्यात जखमी झालेली व्यक्ती व त्याचे कुटुंबिय.

९ ऑगस्टला श्रीनगरमध्ये पोलिसांनी पेलेट गनचा वापर केला. त्यात जखमी झालेली व्यक्ती व त्याचे कुटुंबिय.

४.पर्यटकांना काश्मीर सोडून जाण्यास सांगितल्यानंतर शिकाऱ्याचा व्यवसाय बंद पडला. ११ ऑगस्टला निगीन सरोवरातील एक बोट भाजीपाला घेऊन जात असताना.

पर्यटकांना काश्मीर सोडून जाण्यास सांगितल्यानंतर शिकाऱ्याचा व्यवसाय बंद पडला. ११ ऑगस्टला निगीन सरोवरातील एक बोट भाजीपाला घेऊन जात असताना.

५.खोऱ्यातील दूरध्वनी, इंटरनेट व मोबाईल सेवा बंद केल्यानंतर वर्तमानपत्रांनाही या बंदीची झळ बसली. केवळ चार पानांची वर्तमानपत्रे प्रसिद्ध होऊ लागली. ११ ऑगस्टच्या सकाळची ही परिस्थिती.

खोऱ्यातील दूरध्वनी, इंटरनेट व मोबाईल सेवा बंद केल्यानंतर वर्तमानपत्रांनाही या बंदीची झळ बसली. केवळ चार पानांची वर्तमानपत्रे प्रसिद्ध होऊ लागली. ११ ऑगस्टच्या सकाळची ही परिस्थिती.

६.१२ ऑगस्टला ईद होती. त्यानिमित्ताने ईदच्या प्रार्थनेत सामील झालेल्या महिला.

१२ ऑगस्टला ईद होती. त्यानिमित्ताने ईदच्या प्रार्थनेत सामील झालेल्या महिला.

नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंदी घातल्यानंतरही १२ ऑगस्टला मोठ्या प्रमाणावर नागरिक ईदच्या प्रार्थनेसाठी सोआरा येथे जमा झाले होते.

नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंदी घातल्यानंतरही १२ ऑगस्टला मोठ्या प्रमाणावर नागरिक ईदच्या प्रार्थनेसाठी सोआरा येथे जमा झाले होते.

श्रीनगरच्या एका रस्त्यावरील पोलिस व आंदोलकांच्या चकमकीनंतरचे हे दृश्य.

श्रीनगरच्या एका रस्त्यावरील पोलिस व आंदोलकांच्या चकमकीनंतरचे हे दृश्य.

श्रीनगरमध्ये काही ठिकाणी बॅरिकेड लावल्या आहेत. १२ ऑगस्टचे हे दृश्य.

श्रीनगरमध्ये काही ठिकाणी बॅरिकेड लावल्या आहेत. १२ ऑगस्टचे हे दृश्य.

१०.१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावल्याने रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला.

१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावल्याने रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला.

१५ ऑगस्टला राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

१५ ऑगस्टला राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

१२.१६ ऑगस्ट रोजी श्रीनगरमध्ये पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानचा झेंडा घेऊन निदर्शने करण्यात आली.

१६ ऑगस्ट रोजी श्रीनगरमध्ये पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानचा झेंडा घेऊन निदर्शने करण्यात आली.

१३.एक निदर्शक छतावर उभे राहून पाकव्याप्त काश्मीरचा झेंडा फडकवताना.

एक निदर्शक छतावर उभे राहून पाकव्याप्त काश्मीरचा झेंडा फडकवताना.

१४.श्रीनगरमध्ये निदर्शक व पोलिस यांच्यातील चकमक

श्रीनगरमध्ये निदर्शक व पोलिस यांच्यातील चकमक

१५.श्रीनगरमधील सोअरा येथे चकमक.

श्रीनगरमधील सोअरा येथे चकमक.

१६.राज्यातील टपाल सेवा बंद आहे. २२ ऑगस्ट रोजी श्रीनगरमधील टपाल कार्यालयाचे टिपलेले दृश्य.

राज्यातील टपाल सेवा बंद आहे. २२ ऑगस्ट रोजी श्रीनगरमधील टपाल कार्यालयाचे टिपलेले दृश्य.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1