‘फेअर अँड लव्हली’ नव्हे, आता ‘ग्लो अँड लव्हली’

‘फेअर अँड लव्हली’ नव्हे, आता ‘ग्लो अँड लव्हली’

नवी दिल्लीः तेल, साबण व सौंदर्य प्रसाधने बनवणार्या हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने गेले ४० वर्षे बाजारात असलेले आपले उत्पादन ‘फेअर अँड लव्हली’मधील ‘फेअर

कापुस्किनस्की यांचं नवं पुस्तक
बोलिवियातील सत्तासंघर्ष
परदेशी लशींच्या आयातीचा केंद्राचा निर्णय

नवी दिल्लीः तेल, साबण व सौंदर्य प्रसाधने बनवणार्या हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने गेले ४० वर्षे बाजारात असलेले आपले उत्पादन ‘फेअर अँड लव्हली’मधील ‘फेअर’ हा शब्द वगळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘फेअर अँड लव्हली’ या नावाखाली हिंदुस्तान लिव्हरकडून त्वचेचा रंग उजळ करण्याचे क्रीम विकले जात होते. भारतामध्ये या क्रीमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे व याची सुमारे २ हजार कोटी रु.ची वार्षिक उलाढाल आहे.

जगभरात रंगभेदाविरोधात जनमत आकारास येत असल्यामुळे या कंपनीने आपल्या उत्पादनाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात असले तरी कंपनीच्या प्रवक्त्यांनी मात्र रंगभेदाविरोधात जगभरात सुरू असलेल्या चळवळींचा याच्याशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

‘फेअर अँड लव्हली’ ऐवजी ‘ग्लो अँड लव्हली’ या नव्या नावाची नोंदणी कंपनीने केली असली तरी त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ‘फेअर’ शब्द उत्पादनातून वगळण्याबाबत कंपनीने अधिकृत खुलासा केलेला नाही. मात्र १७ जून २०२० रोजी कंपनीने ‘कंट्रोलर जनरल ऑफ पेटेंट डिझाइन अँड ट्रेडमार्क’ केलेल्या अर्जात ‘ग्लो अँड लव्हली’ असे नाव बदलून मिळावे अशी विनंती केलेली आहे.

गेली काही वर्षे कंपनी आपल्या उत्पादनांच्या दर्जांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘फेअर अँड लव्हली’ या उत्पादनाची बाजारपेठ सुमारे २ हजार कोटी रु.ची असून ती अधिक विस्तारित करण्यासाठी व ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव्या संकल्पना आणण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

चेहरा सुंदर व आकर्षक दिसावा यासाठी आपल्या उत्पादनामध्ये काही बदल केले जात असून आपले उत्पादन सर्वसमावेशक असावे यासाठी गेले काही महिने चर्चा सुरू होती असे कंपनीचे संचालक संजीव मेहता यांनी सांगितले. आमच्या कंपनीचा ‘फेअर अँड लव्हली’ व्यतिरिक्त त्वचेसंदर्भातील अन्य उत्पादनात सकारात्मक बदल आणून चेहरा अधिक आकर्षक दिसावा याचा नवा दृष्टीकोण ग्राहकांपुढे आणण्याचा उद्देश असून गेल्या वर्षी आम्ही जाहिरातीतील दोन चेहरे हटवले होते व आता गोरेपणा ऐवजी त्वचा उजळ दिसावी यासाठी आमचे उत्पादन असेल असे संजीव मेहता म्हणाले.

फेअर अँड लव्हली या उत्पादनाच्या भारतातील बाजारपेठेच मोठा हिस्सा असून सुमारे ७० टक्के उत्पादनाची विक्री ग्रामीण भागात तर ३० टक्के उत्पादने शहरी बाजारपेठेत विकली जातात.

भारतात त्वचेला गोरेपणा आणण्याचा दावा करणारी उत्पादने ‘प्रॉक्टर अँड गॅम्बल’, ‘गार्नियर’ (‘लॉरियल’), ‘ईमामी’ व ‘हिमालय’सारख्या कंपन्यांकडूनही विकली जात आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0