विस्तारवादाचे युग संपलेयः मोदींचा चीनला इशारा

विस्तारवादाचे युग संपलेयः मोदींचा चीनला इशारा

नवी दिल्लीः काही दिवसांपूर्वी भारत-चीनच्या सैनिकांमध्ये लडाखमध्ये हाणामारी होऊन त्यात २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटनेनंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरे

चीनची ताठर भूमिका, गलवान खोरे आपलेच असल्याचा दावा
वुहानला मुंबईने मागे टाकले
‘गलवानमध्ये चीनचा झेंडा, मोदी गप्प का?’

नवी दिल्लीः काही दिवसांपूर्वी भारत-चीनच्या सैनिकांमध्ये लडाखमध्ये हाणामारी होऊन त्यात २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटनेनंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास संरक्षक प्रमुख बिपीन रावत व लष्करप्रमुख नरवणे यांच्यासोबत लडाखला भेट दिली. या भेटीत त्यांनी तिन्ही दलांच्या व इंडो तिबेटीयन पोलिस दलाच्या जवानांच्या मनोधैर्याचे कौतुक करत त्यांच्या साहसाची प्रशंसा केली.

लडाखनजीक निमू येथे मोदी जवानांना भेटले. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर असून ते झस्कार पर्वतराजींमध्ये अत्यंत दुर्गम ठिकाणी आहे.

आपल्या भाषणात उपस्थित जवानांना उद्देशून मोदी म्हणाले, तुम्ही सर्वांनी पराक्रम दाखवला आहे त्यामुळे आत्मनिर्भर भारत अधिक मजबूत झाला आहे. तुमच्या धैर्याने व साहसामुळे देशाच्या दुश्मनांना धडा मिळाला असून आता विस्तारवादाचे युग समाप्त झाले आहे आणि विकासचे युग सुरू झाले आहे. विकासच भविष्याचा आधार आहे. गेल्या शतकात विस्तारवादाने मानवतेचा नाश करण्याचा प्रयत्न केला. हा विस्तारवाद जागतिक शांततेला धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी पुढे म्हणाले, लडाख भारताचे मस्तक आहे. १३० कोटी जनतेच्या मानसन्मानाचे प्रतीक आहे. हा प्रदेश देशभक्तांचा आहे. या प्रदेशातील प्रत्येक सामान्य नागरिक देशाला मजबूत करण्यासाठी प्रेरणा देत आहे. लडाखचा कानाकोपरा, येथील नद्या, येथील दगड-गोटे भारताचे अभिन्न अंग आहे. हा प्रदेश देशाची प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींनी आपल्या भाषणात चीनचे नाव घेतले नाही पण त्यांचा रोख चीनवर होता. हे भाषण ऐकणार्या जवानांनी सामाजिक विलगता पाळल्याचे दिसून आले.

मोदी यांनी, आम्ही बासरी वाजवणार्या कृष्णाची पूजा करतो त्याचबरोबर सुदर्शनधारी कृष्णाचाही आदर करतो. या प्रेरणेमुळे भारत कोणत्याही आक्रमणानंतर सशक्त होऊन उभा राहात असल्याचा टोला चीनचे नाव न घेता लगावला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0