चीनची नवी तिबेट रेल्वे अरुणाचल नजीक येणार

चीनची नवी तिबेट रेल्वे अरुणाचल नजीक येणार

तिबेटमधील लिंझ्ही ते नैर्ऋत्य शिहुआन प्रांत यांना जोडणार्या रेल्वे मार्गाला रविवारी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी परवानगी दिली. या रेल्वे मार्गाचा एक

‘चीनपेक्षा भारतानेच अनेक वेळा घुसखोरी केली’
गलवानमध्ये ५ जवान ठार झाल्याची चीनची कबुली
लोकदबावापुढे हाँगकाँगचे वादग्रस्त विधेयक मागे

तिबेटमधील लिंझ्ही ते नैर्ऋत्य शिहुआन प्रांत यांना जोडणार्या रेल्वे मार्गाला रविवारी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी परवानगी दिली. या रेल्वे मार्गाचा एकूण खर्च ४७.८ अब्ज डॉलर इतका असून या मार्गामुळे भारत-चीन सीमा भागात चीनला अधिक हालचाली करण्यास वाव मिळणार आहे. तिबेटच्या भागात रेल्वे आल्याने अरुणाचल प्रदेशला धोका निर्माण झाला आहे. तिबेटमधील लिंझ्ही हे ठिकाण अरुणाचल प्रदेशाच्या नजीक आहे.

या अगोदर चीन क्विंघाई-तिबेट रेल्वे मार्ग तयार केला होता. या रेल्वेमार्गामुळे तिबेट पठारावर वाहतूक व व्यापारास चालना मिळाली होती.

हा नवा रेल्वे मार्ग उभा करण्यामागे राष्ट्रीय एकता प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट्य असून चीन व तिबेटच्या प्रदेशात राहणार्या सर्व वंशांना, आदिवासी जमातींना एकाच राजकीय छत्राखाली आणण्याचे व या प्रदेशात शांतता व सुरक्षा प्रस्थापित करण्याचे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे प्रयत्न आहेत.

शिहुआन-तिबेट रेल्वे मार्गाचे एक अंतिम स्थानक शिहुआनची राजधानी चेंगडू येथे असेल. ही रेल्वे यान प्रदेशातून क्वामडो मार्गे तिबेटमध्ये प्रवेश करेल. या रेल्वे मार्गामुळे चेंगडू ते ल्हासा या प्रवासाचा कालावधी ४८ तासावरून १३ तासांवर येईल.

भारत-चीन सीमा ही ३,४८८ किमी इतकी लांब असून भारताचा अरुणाचल प्रदेश हा द. तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनचा आहे. हा दावा भारताने अनेकदा फेटाळला आहे.

लिंझ्ही येथे विमानतळही असून हिमालयच्या प्रदेशाच चीनने आतापर्यंत ५ विमानतळे बांधलेली आहे.

यान-लिंझ्ही हा रेल्वेमार्ग १,०११ किमी इतका असून यात २६ स्थानके आहेत. या मार्गावरील रेल्वे ताशी १२० ते २०० किमी मार्गाने धावणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0