गुंड विकास दुबे चकमकीत ठार

गुंड विकास दुबे चकमकीत ठार

नवी दिल्लीः कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे चकमकीमध्ये आज सकाळी ठार झाला. विकास दुबेला गुरुवारी सकाळी मध्यप्रदेशात उज्जैन येथील महाकाल

डॉ. बाबा आढाव-सामाजिक कार्याची नवनीती
मान्सून केरळमध्ये, राज्यात आठवडाभरात पावसाची शक्यता
राज्याच्या रेमडेसिवीर पुरवठ्यात वाढ

नवी दिल्लीः कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे चकमकीमध्ये आज सकाळी ठार झाला.

विकास दुबेला गुरुवारी सकाळी मध्यप्रदेशात उज्जैन येथील महाकाल मंदिरात अटक करण्यात आली होती. उत्तर प्रदेश एसटीएफने त्याला उज्जैनमधून ताब्यात घेऊन उत्तर प्रदेशात घेऊन जात होते. कानपूरमध्ये दाखल होताच, भौती या गावाजवळ विकासला घेऊन जाणारी गाडी उलटली. गाडी उलटल्यावर विकासने पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसानी त्याला शरण येण्यास सांगितले. पण विकासने गोळीबार केल्याने झालेल्या चकमकीमध्ये टो मारला गेल्याचे पोलिसानी सांगितले.

गेल्या गुरुवारी चकमकीत ८ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे याला गुरुवारी सकाळी म. प्रदेशात उज्जैन शहरात अटक करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी तो हरियाणात फरिदाबादमध्ये दिसला होता. त्यानंतर त्याच्यावर ५ लाख रु.चे बक्षिस घोषित करण्यात आले होते.

काल गुरुवारी सकाळी दुबे उज्जैन येथील महाकाल मंदिरात जात असताना त्याला दोन सुरक्षा जवानांनी ओळखले व त्याची माहिती स्थानिक पोलिसांना त्वरित दिली गेली. पोलिस लगेचच आले व त्यांनी दुबेला पकडून त्याची ओळख विचारली. अखेर ओळख पटल्यानंतर ही बातमी वार्यासारखी पसरली.

दुबे याच्या अशा अनपेक्षित अटकेनंतर म. प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पोलिसांसाठी हे मोठे यश असल्याचे सांगत, विकास दुबे हा क्रूर मारेकरी असून तो म. प्रदेशात येण्याची शक्यता असल्याने सर्व पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला होता. त्याला पकडल्याची माहिती उ. प्रदेश पोलिसांना सांगितली असल्याचे ते म्हणाले.

दुबेला महाकाल मंदिरात पकडले का, असे विचारले असता मिश्रा म्हणाले, त्याला मंदिराच्या आवारात की बाहेर पकडले असे प्रश्न विचारू नका, त्याला उज्जैनमध्ये पकडण्यात आले असून मंदिरातील काही पुजारी व नागरिकांनी त्याचा चेहरा ओळखला व तशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांना त्याला अटक केली, असे सांगितले.

विकास दुबे याला मारल्यानंतर चकमकीबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. ही चित्रपटाची संहिता असल्याचे अनेकांनी म्हंटले आहे.

विकासला घेऊन जाणारी गाडी उलटी झाली नाही, तर सरकार उलटे होण्यापासून वाचल्याची टीका माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0