मुंबईः टीआरपीमध्ये बदल करण्यासाठी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याकडून तीन वर्षांच्या फॅमिली ट्रीपसाठी सुमारे १२ हजार डॉलर व एकूण ४० ला
मुंबईः टीआरपीमध्ये बदल करण्यासाठी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याकडून तीन वर्षांच्या फॅमिली ट्रीपसाठी सुमारे १२ हजार डॉलर व एकूण ४० लाख रु. मिळाल्याचा जबाब ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल (बार्क)चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना दिला आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितानुसार ११ जानेवारीला मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यासंदर्भात सुमारे ३,६०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात बार्कचा फॉरन्सिक ऑडिट रिपोर्ट, दासगुप्ता व गोस्वामी यांच्यातील कथित व्हॉट्सअप संभाषण व कौन्सिलमधील काही कर्मचारी-केबल ऑपरेटर अशा ५९ जणांचे जबाब लिखित रुपात आहेत.
ऑडिट रिपोर्टमध्ये रिपब्लिक, टाइम्स नाउ, आजतक यांच्यासहित काही वृत्तवाहिन्यांची नावे आहेत ज्यांच्याकडून टीआरपी घोटाळा झाल्याचे निष्पन्न होत आहे.
आरोपपत्रात दासगुप्ता, बार्कचे माजी सीईओ रोमिल रामगढिया, रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ विकास खानचंदानी यांचीही नावे आहेत. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दासगुप्ता यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे कीः २००४पासून ते अर्णब गोस्वामी यांना ओळखतात. दोघांची ओळख टाइम्स नाउ या वृत्तवाहिनीत झाली. २०१३मध्ये दासगुप्ता यांनी बार्कचे सीईओ म्हणून सूत्रे घेतली. तर २०१७मध्ये रिपब्लिक इंडिया वृत्तवाहिनी सुरू झाली होती. रिपब्लिक वृत्तवाहिनी सुरू करताना गोस्वामी यांनी टीआरपी चांगला मिळावा म्हणून अप्रत्यक्ष मदत मागण्यास सुरूवात केली. टीआरपी सिस्टिमची मला माहिती असल्याचे गोस्वामी यांना लक्षात आल्याने त्यांनी मदत करण्यास सांगितले होते. त्यानुसार रिपब्लिक टीव्हीचे रेटिंग क्रमांक एकचे असावे म्हणून आम्ही तसे काम सुरू केले. २०१७ ते २०१९ या काळात रिपब्लिकचे रेटिंग पहिल्या क्रमांकावर होता.
२०१७मध्ये मुंबईतल्या लोअर परळ येथील सेंट रेजिस हॉटेलमध्ये गोस्वामी यांनी मला बोलावले होते. यावेळी त्यांनी फ्रान्स, स्वित्झर्लंडची फॅमिली ट्रिपसाठी मला ६ हजार डॉलर दिले. त्यानंतर २०१९मध्ये त्यांनी पुन्हा मला स्वीडन, डेन्मार्कच्या फॅमिली ट्रीपसाठी ६ हजार डॉलर दिले. नंतर आयटीसी हॉटेलमध्ये त्यांनी आणखी २० लाख रु. दिले. २०१८ ते २०१९ या काळात आयटीसी हॉटेलमध्ये त्यांनी मला दोनवेळा झालेल्या बैठकीत प्रत्येकी १० लाख रु. दिले.
दरम्यान दासगुप्ता यांच्या वकिलांनी पोलिसांच्या दबावात जबाब नोंदवून घेतल्याचा आरोप केला आहे. आम्हाला कोणतेही आरोप मान्य नाहीत, अशा जबाबाचा न्यायालयात टिकाव लागणार नाही, असे वकिलांनी म्हटले आहे.
मूळ बातमी
COMMENTS