कोरोना दैवी संकटः निर्मला सीतारामन

कोरोना दैवी संकटः निर्मला सीतारामन

नवी दिल्लीः कोरोना महासाथ हे एक दैवी संकट असून त्यामुळे जीएसटी संकलनात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे कारण गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

सामुहिक प्रतिकारशक्ती वाढवण्याला पर्याय नाही: डॉ. मुलीयील
संपूर्ण राज्य बंद
मान्यवरांच्या राज्यसरकारला सूचना

नवी दिल्लीः कोरोना महासाथ हे एक दैवी संकट असून त्यामुळे जीएसटी संकलनात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे कारण गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी परिषदेत सांगितले. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत जीएसटी संकलनातील तूट २.३५ लाख कोटी रु. इतकी येईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला. या बैठकीत राज्यांनी आपली महसूली तूट भरून काढण्यासाठी बाजारात कर्ज उचलावे असेही सरकारने सांगितल्याचे पीटीआयचे वृत्त आहे.

या बैठकीत राज्यांना देण्यात येणार्या जीएसटी वाटपाचा मुद्दा महत्त्वाचा होता. यावेळी सीतारामन म्हणाल्या, कोरोना महासाथीचे आव्हान सर्वांसमोर उभे ठाकले आहे, ते दैवी संकट असून त्यातून आपणाला मंदीचाही सामना करावा लागणार आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारने २०१९-२० या आर्थिक वर्षांत राज्यांना १.६५ लाख कोटी रु. जीएसटी वर्ग केला होता. यात मार्चमधील १३,८०६ कोटी रु. समाविष्ट आहेत.

या बैठकीत सर्व राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोविड-१९च्या काळात केंद्राकडून जीएसटी भरपाई न मिळाल्याने अनेक राज्ये आक्रमक झाली आहेत. काँग्रेस व बिगर भाजपशासित राज्यांच्या प्रतिनिधींनी त्यांना महसूली तुटीमुळे होणार्या प्रश्नांचा सरकारपुढे पाढा वाचला. कोविड-१९च्या काळात महसूली तूटीचा राज्यांना मोठा फटका बसला असून ती तूट भरून काढण्याची घटनात्मक जबाबदारी केंद्र सरकारवर येत आहे, असेही या राज्यांचे मत आहे.

त्यावर केंद्र सरकारने सांगितले की, महसुली तूट आल्यास त्याची भरपाई करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर येत नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0