हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडमधील १५ टक्के हिस्सा मोदी सरकार विकणार असून या कंपनीच्या प्रति शेअरची किंमत १,००१ रु. इतकी निश्चित केली आहे. या विक्रीमु
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडमधील १५ टक्के हिस्सा मोदी सरकार विकणार असून या कंपनीच्या प्रति शेअरची किंमत १,००१ रु. इतकी निश्चित केली आहे. या विक्रीमुळे सरकारला ५,०२० कोटी रु. मिळतील, असा अंदाज आहे.
इकॉनॉमिक टाइम्सने या संदर्भात वृत्त दिले असून केंद्र सरकार एचएलएलमधील आपला हिस्सा ‘ऑफर फॉर सेल’ (ओएफएस)नुसार विकणार आहे. ओएफएसच्या माध्यमातून सरकार आपल्याकडील ३,३४,३८,७५० इक्विटी शेअरची विक्री करणार असून हा सरकारचा एचएलएलमधील १० टक्के हिस्सा आहे. त्याचबरोबर सरकार १६,७१९,३७५ इक्विटी शेअरही विकणार असून हा हिस्सा ५ टक्के आहे. ओएफएसची प्रक्रिया २७-२८ ऑगस्ट रोजी पूर्ण होत आहे. गेल्या बुधवारी एचएलएल कंपनीच्या शेअरचा भाव ११७७.७५ रुपये इतका होता.
एचएलएलमध्ये सरकारचे ८९.९७ टक्के हिस्सा असून ही कंपनी नवरत्न म्हणून ओळखली जाते. २००७ जूनमध्ये या कंपनीला नवरत्न असा दर्जा देण्यात आला होता. ही कंपनी संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी सरकारी कंपनी आहे.
२०२०-२१मध्ये सरकारने २.१० लाख कोटी रु. निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले होते. त्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातून १.२० लाख कोटी रु. तर अन्य ९० हजार कोटी रु. वित्तीय संस्थांमधील आपली हिस्सेदारी विकण्याचा सरकारचा हेतू होता.
मूळ बातमी
COMMENTS