टीआरपी रॅकेटमध्ये रिपब्लिक टीव्ही

टीआरपी रॅकेटमध्ये रिपब्लिक टीव्ही

मुंबईः ‘रिपब्लिक टीव्ही’, ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ या तीन टीव्ही वाहिन्यांनी एका टीआरपी एजन्सीच्या मार्फत ग्राहकांना महिना ४०० ते ५०० रु. देऊन आपल

अर्णव प्रकरणात प्रेस कौन्सिलचा हस्तक्षेप पक्षपाती!
अर्णवला अटकपूर्वी ३ दिवस नोटीस हवी
अर्णववरच्या दोन फिर्यादींवरील कारवाई रोखली

मुंबईः ‘रिपब्लिक टीव्ही’, ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ या तीन टीव्ही वाहिन्यांनी एका टीआरपी एजन्सीच्या मार्फत ग्राहकांना महिना ४०० ते ५०० रु. देऊन आपला टीआरपी वाढवला असल्याचा खळबळजनक खुलासा मुंबई पोलिसांनी गुरुवारी केला. या प्रकरणात ‘फक्त मराठी’ व ‘बॉक्स सिनेमा’ या वाहिन्याच्या मालकांना अटक केली असून ८ लाख रु.ची रक्कम जमा करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये आढळलेल्या या वाहिन्यांमधील प्रमोटरपासून कोणाही वरिष्ठ, कनिष्ठाची चौकशी केली जाईल, असे मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग स्पष्ट केले.

टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट हे टीव्ही कार्यक्रम, टेलिव्हिजन वाहिन्यांची लोकप्रियता मोजमाप करण्याचे साधन असून प्रेक्षकांना कोणता कार्यक्रम सर्वाधिक आवडतो वा कोणती वाहिनी आवडते हे टीआरपी मानकावरून कळते व त्यानुसार जाहिरातीचा ओघ सर्वाधिक टीआरपी असलेल्या वाहिन्यांना मिळतो.

मुंबई पोलिसांच्या मते, ‘रिपब्लिक टीव्ही’च्या हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्या, ‘फक्त मराठी’ व ‘बॉक्स सिनेमा’ यांनी हंसा या टीआरपी एजन्सीला हाताशी धरून आपला टीआरपी वाढवला होता. या एजन्सीच्या माध्यमातून ग्राहकांनी या वाहिन्या पाहाव्यात म्हणून त्यांना दरमहिना ४०० ते ५०० रु. दिले जात होते. अशिक्षित घरांना इंग्रजी वाहिनी बघण्यास सांगितले जात होते. टीआरपीच्या आकडेवारीत बदल केले जात होते. या रॅकेटमध्ये ‘फक्त मराठी’ व ‘बॉक्स सिनेमा’ वाहिन्यांचे चालकही आढळल्याचा पोलिसांचा संशय असून ‘रिपब्लिक टीव्ही’ने पैसे देऊन टीआरपी रेटिंग वाढवल्याचे पुरावे हाती लागल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले.

रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तकांना समन्स

टीआरपीच्या या रॅकेटमध्ये ‘रिपब्लिक टीव्हीचे’ नाव आढळल्याने या कंपनीचे प्रवर्तक व संचालक यांना समन्स बजावण्यात येणार असल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले.

या तीन वाहिन्यांची बँक खात्याची चौकशी केली जाईल, टीआरपी रॅकेटमध्ये सामील असणार्यांना पोलिस चौकशीसाठी बोलावतील, असेही परमबीर सिंग यांनी सांगितले.

या वाहिन्यांनी टीआरपी वाढवण्यासाठी ग्राहकांना पैसे दिले असून ती फसवणूक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

दरम्यान, टीआरपी रॅकेटमध्ये ‘रिपब्लिक टीव्ही’चे नाव आल्यानंतर या वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई पोलिस आयुक्तांवरच आरोप करत सुशांत सिंह आत्महत्येच्या संदर्भातल्या चौकशीवरून  परमबीर सिंग यांना सतत प्रश्न विचारल्याने त्यांनी असे आरोप केल्याचा आरोप केला. परमबीर सिंग यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागावी अन्यथा न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे, असा इशारा गोस्वामी यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0