श्रीनगरः पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांना शुक्रवारी त्यांच्या घरीच स्थानबद्ध करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यं
श्रीनगरः पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांना शुक्रवारी त्यांच्या घरीच स्थानबद्ध करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने पीडीपीचे युवा अध्यक्ष वाहिद उर रहमान पर्रा यांना दहशतवादी गटाशी संबंध असल्याच्या कारणांवरून अटक केली आली होती. त्या संदर्भात वाहिद यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मेहबुबा मुफ्ती शुक्रवारी जाणार होत्या. त्या आधी सकाळीच त्यांना घरी स्थानबद्ध करण्यात आले. आपल्याला स्थानबद्ध केल्याचे ट्विट मेहबुबा यांनी केले. भाजपचे व त्यांच्या मित्र पक्षाचे नेते काश्मीर खोर्यात निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना विरोधकांना मात्र जनतेपर्यंत भेटू दिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला. आपली मुलगी इल्तिजा यांनाही नजरकैदेत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.
शनिवारी जम्मू व काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकांची पहिली फेरी होत असून या निवडणुकांत भाजप व अपनी पार्टीच्या विरोधात काश्मीर खोर्यातील सर्व पक्ष गुपकार आघाडीअंतर्गत उभे ठाकले आहेत.
काश्मीरातील दहशतवादी गटांशी संबंध असल्याच्या आरोपावरून बुधवारी वाहिद पर्रा यांना एनआयएने ताब्यात घेतले होते. पर्रा यांना जिल्हा विकास परिषद निवडणुकांसाठी अर्ज दाखल केला आहे. ते पुलवामा जिल्ह्यातून लढत आहेत.
२०१६मध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरात क्रीडा क्षेत्राला गती आणण्याचे प्रयत्न केल्याबद्दल पर्रा यांचे कौतुक केले होते.
दरम्यान द वायरशी बोलताना इल्जिता मुफ्ती यांनी काश्मीरात भाजपला मोकळे रान देण्यात आल्याचा आरोप केला. आम्ही वाहिदच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पुलवामात जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण जिल्हा प्रशासनाने सुरक्षिततेचे कारण सांगून नजरकैदेत ठेवले. पोलिसांनी आपल्याला सुरक्षा दिली पाहिजे पण येथे पोलिस घरातूनच बाहेर पडू देत नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मूळ बातमी
COMMENTS