उ. प्रदेश, उत्तराखंडमध्ये बसपा स्वतंत्र लढणार

उ. प्रदेश, उत्तराखंडमध्ये बसपा स्वतंत्र लढणार

नवी दिल्लीः उ. प्रदेश व उत्तराखंडमध्ये होणार्या आगामी विधानसभा निवडणुकीत आमचा पक्ष स्वतंत्रपणे लढेल असे बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी रव

भाजपला मत देईनः मायावतींची अखिलेशला धमकी
काँग्रेस गंभीर आहे का?
मायावतींचे पुन्हा एकला चलो रे…

नवी दिल्लीः उ. प्रदेश व उत्तराखंडमध्ये होणार्या आगामी विधानसभा निवडणुकीत आमचा पक्ष स्वतंत्रपणे लढेल असे बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी रविवारी जाहीर केले. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षाशी बसपा युती करणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यालाही मायावती यांनी विराम देत आमचा पक्ष स्वतंत्रपणे, स्वतःच्या ताकतीवर निवडणुकांना सामोरा जाईल असे स्पष्ट केले.

पण पंजाबमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकांसाठी शिरोमणी अकाली दलाशी आपली युती असेल असे मायावतींनी म्हटले आहे.

उ. प्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले अशी चिन्हे मायावतींच्या या घोषणेने स्पष्ट दिसत आहेत. कारण काही दिवसांपूर्वी राज्यातल्या पंचायत समितीच्या निवडणुकांत बसपाला मोठा पराभव पत्करावा लागला होता. हा पक्ष समाजवादी पार्टी व भाजपानंतर तिसर्या स्थानावर आला होता. त्यामुळे राज्यात नवी राजकीय समीकरणे उभी करण्याच्या दृष्टीने ओमप्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (एसबीएसपी) व एआयएमआयएमशी आघाडी करेल अशा चर्चा सुरू होत्या. एका वृत्तवाहिनीने बसपा या पक्षांशी युती करेल असेही वृत्त दिले होते. पण ही सर्व वृत्ते तथ्यहिन व संभ्रम पसरवणारी असल्याचे मायावतींनी सांगितले.

गेल्या आठवड्यात सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी आपली युती नसेल असेही म्हटले होते.

पंजाबात शिरोमणी अकाली दलाशी पुन्हा नव्याने युती करण्याचा बसपाचा निर्णय ही राजकीय खेळी आहे. २५ वर्षांपूर्वी बसपा-अकाली दल अशी युती होती. या दोघांनी १९९६मध्ये लोकसभा निवडणुका लढून १३ पैकी ११ जागा मिळवल्या होत्या.

आता आगामी विधानसभा निवडणुकांत दोघांनी जागा वाटपावर शिक्कामोर्तब केले आहे. अकाली दल ९७ जागांवर तर बसपा २० जागांवर लढणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0