‘रिपब्लिक भारत’ला २० लाखांचा दंड

‘रिपब्लिक भारत’ला २० लाखांचा दंड

नवी दिल्लीः गेल्या वर्षी पाकिस्तानच्या जनतेविरोधात मत्सर व विखाराचे भाष्य करणारा कार्यक्रम प्रसारित केल्याबद्दल ब्रिटीश टीव्ही नियामक प्राधिकरण ऑफ कॉम

अमित शहा, राजनाथ नेहरु सोसायटीचे सदस्य
अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचा सुलेमानी ठार; तणाव वाढला
‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’

नवी दिल्लीः गेल्या वर्षी पाकिस्तानच्या जनतेविरोधात मत्सर व विखाराचे भाष्य करणारा कार्यक्रम प्रसारित केल्याबद्दल ब्रिटीश टीव्ही नियामक प्राधिकरण ऑफ कॉमने रिपब्लिक भारत या भारतीय वृत्तवाहिनीवर सुमारे २० लाख रु. चा (२० हजार पाउंड) दंड ठोठावला आहे. हा कार्यक्रम ‘पुछता है भारत’ अंतर्गत ६ सप्टेंबर २०१९मध्ये प्रसिद्ध झाला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे निवेदक अर्णव गोस्वामी  व कार्यक्रमात सहभागी झालेले पाहुणे वक्ते यांनी पाकिस्तानच्या जनतेविरोधात अभद्र भाषा व अवमानजनक विधाने केली होती. हा कार्यक्रम अत्यंत आक्रमक स्वरुपाचा होता व त्याचे संदर्भ अयोग्य होते, असे ऑफ कॉमचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी भारत सरकारने जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानतर भारत-पाकिस्तान संबंधात तणाव निर्माण झाला होता. त्या वातावरणात हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा विषय भारताची चांद्रयान मोहीम हा होता.

या कार्यक्रमाचे प्रसारण झाल्यानंतर पाकिस्तानी पाहुणे, वक्त्यांशी अवमानकारक भाषेत बोलणे व पाकिस्तानी जनतेविरोधात गरळ ओकणे याबाबत अनेक थरातून तक्रारी आल्या होत्या, असे ऑफ कॉमचे म्हणणे आहे.

ब्रिटनमध्ये रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे प्रसारण वर्ल्ड व्ह्यू मीडिया नेटवर्क लिमिटेडकडून होत असून त्यांना या पुढे ऑफ कॉमच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी लागेल व भविष्यात असे कार्यक्रम त्यांना दाखवता येणार नाहीत.

६ सप्टेंबर २०१९ला प्रसारित झालेला कार्यक्रमाचा मूळ विषय भारताची चांद्रयान मोहीम होता पण या कार्यक्रमात पाकिस्तानची विज्ञानातील प्रगती यावर टिपण्ण्या झाल्या. या कार्यक्रमात पॅनलवर मेजर गौरव आर्या, मेजर जनरल केके सिन्हा, भाजपाचे प्रेम शुक्ला व पाकिस्तानचे ओमार इनाम व ओमार इल्ताफ उपस्थित होते.

या कार्यक्रमात पाकिस्तानच्या वक्त्यांना क्वचितच त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली व भारतीय बाजू सतत सांगितली गेली. भारताच्या वक्त्यांकडून पाकिस्तान हा भारताला धोकादायक नाही तर संपूर्ण पाकिस्तानची जनता भारतासाठी धोकादायक असल्याची विधाने करण्यात आली होती. ही वक्तव्ये पाकिस्तानच्या जनतेच्या विरोधात असल्याने या वृत्तवाहिनीने प्राधिकरणाचे नियम धुडकावले गेले असे ऑफ कॉमचे म्हणणे आहे.

या कार्यक्रमातील भारतीय वक्ते मेजर गौरव आर्या यांनी पाकिस्तान हा शिवी सारखा शब्द सांगून विमानतळावर उतरताच त्यांच्या पासपोर्टचा हिरवा रंग पाहून कसून तपासणी केली जाते असे विधान केले होते. गेल्या वर्षी त्यांच्या पंतप्रधानांची अमेरिकेने कपडे उतरवून तपासणी केली होती. ही त्यांच्या पासपोर्टची ओळख आहे. पाकी शब्द ही एक शिवी आहे. जगात अमेरिका, युरोप व कुठेही जा तेथे ही शिवी दिली जाते असे गौरव आर्या म्हणाले होते.

प्रेम शुक्ला यांनी पाकिस्तानी नागरिकांची तुलना गाढवाशी केली होती. जर आपण गाढवांसोबत विज्ञानाची चर्चा करत असू तर ते गाढव लाथा मारण्याशिवाय काय करणार, हा देश गाढवांनी भरलेला आहे,  त्यांना अवकाश शास्त्राबद्दल काय माहिती आहे, असा सवाल केला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0