कर्नाटकात भाजपमुळे जेडीएसकडे विधान परिषद अध्यक्षपद

कर्नाटकात भाजपमुळे जेडीएसकडे विधान परिषद अध्यक्षपद

बंगळुरुः विधान परिषद अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुरुवारी कर्नाटकातले राजकीय चित्र सर्वस्वी पालटलेले दिसले. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तान

काँग्रेसला पुन्हा उभे राहण्यासाठीची संधी
पंजाबात भाजप ६५ जागा लढवणार
‘संघा’वर बंदी घालण्याची अकाल तख्तची मागणी

बंगळुरुः विधान परिषद अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुरुवारी कर्नाटकातले राजकीय चित्र सर्वस्वी पालटलेले दिसले. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या जनता दल (सेक्युलर)ने विधान परिषद अध्यक्षपद मिळवण्यासाठी भाजपशी संधान साधले. यात भाजपला विधान परिषदेचे अध्यक्षपद सोडावे लागणार असून त्या बदल्यात त्यांना उपाध्यक्षपद मिळणार आहे. केवळ १३ आमदार असलेल्या जनता दल सेक्युलरने ७५ सदस्यांच्या विधान परिषदेत अध्यक्षपदासाठी भाजपकडून ३१ सदस्यांचा पाठिंबा घेतला व त्या बदल्यात ३१ सदस्यांच्या भाजपला उपाध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला.

या सत्तासंघर्षात २९ सदस्य असलेली काँग्रेस एकाकी पडली आहे. २०१७मध्ये विधानसभा निवडणुकांत काँग्रेस-जेडीएसने सत्ता काबीज केली होती व राज्यात काँग्रेसच्या पाठिंब्यावर जेडीएसचे सरकार आले होते. पण नंतर एक वर्षांतच भाजपने हे सरकार पाडून सत्ता हस्तगत केली होती व आता जेडीएसची मैत्रीचे संबंधही प्रस्थापित केले आहे.

काँग्रेस व मुस्लिम लीगला सत्तेबाहेर ठेवायचे व अन्य कोणत्याही पक्षाशी युती करायची अशी भाजपची भूमिका असल्याने आम्ही जेडीएसला विधान परिषद अध्यक्षपद दिले व त्याबदल्यात उपाध्यक्षपद आम्ही मिळवले, अशी प्रतिक्रिया येडियुरप्पा सरकारमधील एक मंत्री एस. ईश्वरप्पा यांनी दिली. तर जेडीएसचे एक नेते बसवराज होरट्टी यांनी आमचा विधान परिषद अध्यक्ष होईल व भाजपचा उपाध्यक्ष होईल यावर सहमती झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, यात एकाकी पडलेल्या काँग्रेसने जेडीएसवर टीका करताना हा पक्ष पूर्वीही सत्तेसाठी भाजपसोबत होता. त्यांचे धर्मनिरपेक्षत्व केवळ नावाला आहे अशी प्रतिक्रिया दिली.

२००६मध्ये भाजप व जेडीएसमध्ये युती होती. त्यावेळी येडियुरप्पा यांच्या पाठिंब्यावर जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते.

या एकूण राजकीय घडामोडीवर काही विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. जेडीएसशी पुन्हा युती करून येडियुरप्पा यांनी राज्यात काँग्रेसला एकाकी पाडले आहे पण त्याचबरोबर त्यांनी असंतुष्ट भाजप बंडखोर आमदारांना त्यांच्याशिवाय सरकार तगू शकते, असा इशाराही दिला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0