नवी दिल्लीः दिल्ली व उत्तर प्रदेश सीमेवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलकांना जागा खाली करण्याचा अंतिम आदेश उ. प्रदेश सरकारने दिल्यानंतर गाझीपूर स
नवी दिल्लीः दिल्ली व उत्तर प्रदेश सीमेवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलकांना जागा खाली करण्याचा अंतिम आदेश उ. प्रदेश सरकारने दिल्यानंतर गाझीपूर सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्य सरकारने या परिसरातील पाणी व वीजही बंद केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.
गाझीयाबाद पोलिस व जिल्हा प्रशासनाने हे आदेश काढले असून परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय पांडेय व अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी गेले होते. उ. प्रदेश सरकारने आंदोलकांना हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निमलष्करी दलाच्या तुकड्याही पाठवल्या आहेत. या तुकड्यांनी गुरुवारी फ्लॅगमार्चही काढला होता.
उ. प्रदेश सरकारच्या या निर्णयानंतर संतप्त शेतकर्यांनी उ. प्रदेशात जागोजागी ठिय्या आंदोलन पुकारले जाईल असा इशारा दिला आहे. तर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैट यांनी पोलिसांनी आम्हाला अटक केल्यास त्याला आम्ही सामोरे जाऊ. आमचे आंदोलन शांततामय सुरू राहीलच, अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान बुधवारी रात्री उ. प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन पोलिसांनी जबरदस्तीने उधळून लावले. या ठिकाणी १९ डिसेंबर २०२० पासून आंदोलन सुरू होते.
COMMENTS