लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेचे आदेश

लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेचे आदेश

रांचीः चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणात गेली ४० महिने जेलमध्ये असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची

जेडीयूत नेतृत्व बदल; अरुणाचलात भाजपचा धक्का
मुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८
चारा घोटाळाः ५व्या खटल्यात लालूंना ५ वर्षांचा कारावास

रांचीः चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणात गेली ४० महिने जेलमध्ये असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची शिक्षा पुरी झाल्याने त्यांची सुटका करण्याचे आदेश विशेष सीबीआय न्यायालयाने दिले आहेत. जामीन बाँड व एकेक लाख रु.च्या दोन वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन द्यावा असे आदेश सीबीआय विशेष न्यायालयाने दिले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेले ४० महिने लालू प्रसाद यादव दिल्लीतील एम्स रुग्णालयात न्यायालयीन कोठडीत आहेत. २३ डिसेंबर २०१७मध्ये लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली होती. एम्स प्रशासनाने मात्र  त्यांच्या सुटकेवर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यांच्या प्रकृतीचा अहवाल आल्यानंतर प्रक्रिया पुरी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

१९९१ ते १९९६ या दरम्यान राज्याच्या पशुपालन खात्यांतील काही अधिकार्यांच्या माध्यमातून साडे तीन कोटी रु.चा अपहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्या वेळी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी लालू प्रसाद यादव होते. या घोटाळ्याप्रकरणी ट्रायल कोर्टने लालू प्रसाद यादव यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवून सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.

लालू यादव यांच्यावर डोरंडा कोषागार भ्रष्टाचाराचेही एक प्रकरण सीबीआयमध्ये प्रलंबित आहे. त्याचा निकाल येणे अद्याप बाकी आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: