नवी दिल्लीः २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडीला १२४ जागा मिळाल्या असून निवडणूक आयोगाकडून तसे सर्टिफिकेट मिळाल्याचा भाजपने रात्
नवी दिल्लीः २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडीला १२४ जागा मिळाल्या असून निवडणूक आयोगाकडून तसे सर्टिफिकेट मिळाल्याचा भाजपने रात्री उशीरा दावा केला. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएचे सरकार चौथ्यांदा सत्तेवर आले असे बिहार अध्यक्षांनी जाहीर केले. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच राहतील असे बिहारचे भाजपचे नेते सुशील कुमार मोदी यांनी स्पष्ट केले. भाजपने मतमोजणीस वेळ झाल्यामागे इव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरजेडीच्या आरोपाचीही खिल्ली उडवली आहे.
दरम्यान मंगळवारी रात्री बिहारमध्ये एनडीएचे सरकार आल्याचे ट्विट पंतप्रधान मोदींपासून गृहमंत्री अमित शहा व अन्य केंद्रीय मंत्री व बिहारमधील भाजप नेत्यांना केले. या नेत्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले. पण चुरशीच्या या निवडणुकीत आरजेडीने ७६ जागांवर आघाडी घेत भाजपला (७३) मागे टाकल्याचे चित्र मंगळवार रात्री १२ पर्यंत होते.
तर दुसरीकडे आरजेडीने आम्हाला ८६ जागा मिळाल्याचा दावा केला आहे. महागठबंधनचे सरकार सत्तेवर येईल, असे पक्षाचे म्हणणे आहे.
रात्री १२ वाजेपर्यंत एनडीए १२४ जागांवर तर महागठबंधन आघाडी १११ जागांवर पुढे होते. एनडीएतील भाजप ७३ जागांवर तर जेडीयू ४३ जागांवर पुढे होते. तर महागठबंधनमध्ये आरजेडी ७६, काँग्रेस १९, डावे पक्ष १९ आघाडीवर होते.
या निवडणुकांत आयोगाने ६३ टक्के अधिक इव्हीएमचा वापर केला आहे. राज्यात सुमारे सव्वा चार कोटी मतदान झाले होते. कोविडमुळे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. २०१५च्या विधानसभा निवडणुकांत ६५ हजार मतदान केंद्रे होती ती यंदा १ लाख ६ हजार इतकी वाढवण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
भाजपची आघाडी, जेडीयू पिछाडीवर
पहिल्या काही फेर्यांमध्ये जेडीयूची कमालीची पिछेहाट तर भाजपची सरशी दिसून आली होती. नितीश कुमार यांच्याविरोधात लाट असल्याचे काही फेर्यांमधून दिसून आले होते. पण नंतर हे चित्र पालटू लागले. आरजेडीने भाजपलाही मागे टाकले मात्र महागठबंधनमधील घटक पक्ष काँग्रेसची कामगिरी मात्र सुधारली नाही. दुसरीकडे महागठबंधन आघाडीतील डाव्या पक्षांपैकी भाकपा-मालेने ११ जागा तर भाकपाने ७ जागांवर आघाडी घेतली आहे. डाव्या पक्षांची ही आघाडी आश्चर्यकारक आहे. ओवीसी यांच्या एमआयएएमने ५ जागा जिंकल्या.
दरम्यान सकाळीच मतमोजणी सुरू असताना जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ता के. सी. त्यागी यांनी तेजस्वी यांच्यामुळे नव्हे तर कोविड-१९मुळे एनडीएला पराभव पत्करावा लागला असे विधान केले होते. नंतर एनडीएची आघाडी दिसताच पटण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली.
संध्याकाळी दिल्लीतील भाजप मुख्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्याचे ठरवले होते. पण संध्याकाळी चित्र स्पष्ट न झाल्याने कार्यकर्त्यांना दुसर्या दिवशी येण्यास सांगण्यात आले.
COMMENTS