राम मंदिर ट्रस्टवर आर्थिक घोटाळ्याचा आरोप

राम मंदिर ट्रस्टवर आर्थिक घोटाळ्याचा आरोप

लखनौ/अयोध्याः राम मंदिर ट्रस्टच्या जमिनीवर एका भूखंडाच्या खरेदीत कोट्यवधी रु.चा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंप

एसटी संप तोडगा नाही; सरकार हायकोर्टात
कोरोना से कुछ नया सिखोना
पाषाणहृदयींशी संवाद कसा साधायचा, तेवढे फक्त सांगा…

लखनौ/अयोध्याः राम मंदिर ट्रस्टच्या जमिनीवर एका भूखंडाच्या खरेदीत कोट्यवधी रु.चा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी राम मंदिरनजीकचा विक्री झालेला २ कोटी रु.चा भूखंड काही मिनिटांत ट्रस्टच्या तिजोरीतून १८ कोटी ५० लाख रु.ना विकत घेतल्याचे आढळून आले आहे. या भूखंड व्यवहारातील कागदपत्रे रविवारी समाजवादी पार्टी व आम आदमी पार्टीने अयोध्या व लखनौत जाहीर केली व राम मंदिर ट्रस्ट संबंधित सर्वांची ईडी व सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

या प्रकरणात संशयात आलेले चंपत राय यांनी आपल्यावर लावलेल्या आरोपांची चिंता करत नसल्याचे स्पष्ट केले. आमच्यावर गेली १०० वर्षे आरोप लावले जात आहेत. या आधी म. गांधी यांच्या हत्येचे आरोप झाले होते, आता कोणतेही आरोप लावा. तुम्ही आरोप करत राहा, आम्ही आमचे काम करत राहतो, असे उत्तर त्यांनी पत्रकारांना दिले.

नेमके प्रकरण काय?

प्रस्तावित रामजन्मभूमीच्या जमिनीशी लगतचा एक भूखंड पुजारी हरीश पाठक व त्यांच्या पत्नीने १८ मार्च रोजी संध्याकाळी शाम सुल्तान अन्सारी व रवी मोहन या दोघांना २ कोटी रु.ना विकला. हा भूखंड त्याच दिवशी काही मिनिटांत राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी ट्रस्टच्या वतीने १८ कोटी ५० लाख रु. देऊन खरेदी केला.

या तातडीने खरेदी-विक्री प्रकरणावर संशय व्यक्त केला जात आहे. समाजवादी पक्षाचे एक आमदार पवन पांडेय यांनी चंपत राय यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत कोणत्या कारणाने या भूखंडाची किंमत वाढली याचे उत्तर द्यावे असे आव्हान दिले आहे. या भूखंडामध्ये सोने पिकत आहे का, असा प्रश्न करत ज्या जमिनीचा सौदा २ कोटी रु.चा झाला त्या जमिनीची किंमत केवळ १० मिनिटात १८ कोटी ५० लाख रु. कशी झाली असा सवाल त्यांनी केला आहे.

आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनीही ५ मिनिटांत जमीन १६ कोटी ५० लाख रु.ने कशी वाढली, हा विश्वविक्रम असल्याचा दावा केला. रवि मोहन तिवारी व सुल्तान अन्सारी यांच्याकडून १८ कोटी ५० लाख रु.च्या जमिनीचा दर प्रती सेंकद ५ लाख ५० हजार रु.ने वाढला कसा, अशी वाढ भारतातच काय तर जगातही कुठे या पूर्वी दिसून आली नाही, अशी टीका केली.

या जमीन व्यवहाराची कागदपत्रे प्रसार माध्यमांपुढे प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जी जमीन रवि मोहन तिवारी व सुल्तान अन्सारी यांनी पुजारी कुटुंबाकडून २ कोटी रु.ला खरेदी केली होती, त्या जमीन व्यवहारावर साक्षीदार म्हणून राम मंदिर ट्रस्टमधील एक सदस्य अनिल मिश्रा व अयोध्याचे महापौर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेले ऋषिकेश उपाध्याय यांच्या स्वाक्षर्या आहेत. हे दोघे काही मिनिटांनी १६ कोटी ५० लाख रु.चा व्यवहार झाल्याचेही साक्षीदार आहेत.

या एकूण जमीन व्यवहारात राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्यच साक्षीदार असतील तर ते या भ्रष्टाचारात सामील आहेत, असा आरोप समाजवादी पक्षाच्या पवन पांडेय यांनी केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0