१२ वर्षांवरील मुलांच्या ‘डीएनए’ लसीला मंजुरी

१२ वर्षांवरील मुलांच्या ‘डीएनए’ लसीला मंजुरी

नवी दिल्लीः डीएनएवर आधारित झायडस कॅडिला या कंपनीच्या ‘झायकोव्ह-डी’ या लसीला केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. डीएनएवर आधारित ही जगातील पहिलीच

खासगी रुग्णालयातील लसींची किंमत निश्चित
स्वदेशी ‘कोवॅक्सिन’ लसीला तज्ज्ञ समितीची मंजुरी
ब्रिटन, रशियाकडून कोविड लसीकरण मोहिमेस परवानगी

नवी दिल्लीः डीएनएवर आधारित झायडस कॅडिला या कंपनीच्या ‘झायकोव्ह-डी’ या लसीला केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. डीएनएवर आधारित ही जगातील पहिलीच लस असून ही लस १२ वर्षांवरील मुलांनाही देण्यात येणार आहे. या मंजुरीमुळे देशात लवकरच १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण करणे शक्य होणार आहे.

‘झायकोव्ह-डी’ लसीला आपतकालिन परिस्थितीत वापरण्याची मंजुरी देण्यात आली आहे. या लसीच्या चाचणीमध्ये २८ हजार जण सामील झाले होते. तिची परिणामकारकचा ६६.८ टक्के आहे. ही लस इंजेक्शन मुक्त लस असून ती फार्मा जेट इंजेक्शन फ्री सिस्टमद्वारा देण्यात येते. कोरोनावर आजपर्यंत देशात ५ कंपन्यांच्या लस दिल्या जात असून ही सहावी लस आहे. ही लस २ ते ८ अंश सेल्सियस तापमानात साठवून ठेवता येते. झायडस कंपनीने भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी खात्याच्या सहकार्याने ही लस विकसित केली आहे.

झायडस कंपनीने या लसीचे सुमारे १ अब्ज ते १ अब्ज २० कोटी खुराक तयार करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0