मुंबई: महाराष्ट्रात सोमवारपर्यंत ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येते होते. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे आणि त्यामुळे अठरापास
मुंबई: महाराष्ट्रात सोमवारपर्यंत ३० ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येते होते. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे आणि त्यामुळे अठरापासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाला लसीकरणाला मान्यता मंगळवारपासून देत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या तरुणाईला मला यानिमित्ताने सांगावसं वाटतं की, आपण आपापल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन अठरा वर्षाच्या पुढील युवक-युवतीपासून पुढील सर्व वयोगटातील लोकांना लसीकरण करणं आता शक्य होणार आहे.
COMMENTS