पिगॅसस हेरगिरीः प. बंगाल सरकार करणार चौकशी

पिगॅसस हेरगिरीः प. बंगाल सरकार करणार चौकशी

नवी दिल्लीः पिगॅसस हेरगिरी प्रकरणी केंद्र सरकार ढिम्म असून त्यांच्याकडून चौकशी होत नसल्याचा आरोप करत प. बंगाल सरकारने स्वतःच या प्रकरणाची चौकशी करण्या

बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांना मंत्रिमंडळातून काढले
अन्यथा भाजपचा राजीनामा देईन – चंद्र कुमार बोस
प. बंगाल निवडणुकाः काँग्रेस-डाव्यांमध्ये युती

नवी दिल्लीः पिगॅसस हेरगिरी प्रकरणी केंद्र सरकार ढिम्म असून त्यांच्याकडून चौकशी होत नसल्याचा आरोप करत प. बंगाल सरकारने स्वतःच या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन आठवड्यांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिजीत बॅनर्जी यांच्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न पिगॅसस स्पायवेअरमधून झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा भाजप विरोधी तृणमूल असा संघर्ष उफाळून आला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. मदन बी लोकूर व कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्या. ज्योर्तिमय भट्टाचार्य या दोघांकडे या प्रकरणाची चौकशी सोपवली आहे.

अशी समिती नेमण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने कायद्यांतर्गत घेतला आहे, असेही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. पिगॅसस हेरगिरी प्रकरणात सरकार कोणतीच पावले उचलत नसून या प्रकरणाच्या खोलात जाऊन सत्य बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात आपण लवकरच दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह सर्व विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेणार आहोत, असेही बॅनर्जी यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0