दानिश यांची तालिबानकडून क्रूरपणे हत्या

दानिश यांची तालिबानकडून क्रूरपणे हत्या

काबूलः आंतरराष्ट्रीय पत्रकारितेतला प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार विजेते व रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची हत्या तालिबान दहश

अफगाणिस्तान : जी ७ देशांची तातडीची बैठक
काबुल विद्यापीठात दहशतवादी हल्ला, २५ ठार
तालिबान-अमेरिका चर्चा फिसकटल्या

काबूलः आंतरराष्ट्रीय पत्रकारितेतला प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार विजेते व रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांची हत्या तालिबान दहशतवाद्यांकडून क्रूरपणे झाल्याची माहिती अमेरिकी वृत्तसंस्था वॉशिंग्टन एक्झामिनरने दिली आहे. दानिश अफगाणिस्तानातील यादवीचे वृत्तांकन करताना ठार झाल्याचे सांगण्यात आले होते. पण तालिबानने दानिश यांना पकडून त्यांची ओळख पटवून घेतली व नंतर त्यांचा अत्यंत क्रूरपणे खून केला असे वॉशिंग्टन एक्झामिनरचे म्हणणे आहे.

जुलै महिन्याच्या सुरूवातीस अफगाणिस्तानाचे सैनिक व तालिबान दहशतवादी यांच्या दरम्यान कंदहार शहरानजीक स्पिन बोल्डक जिल्ह्यात चकमक सुरू होती. या यादवीचे वृत्तांकन करण्यासाठी सिद्दीकी तेथे गेले होते. या संघर्षात ते व आणखी एक अफगाणी अधिकारी ठार झाल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले होते.

वॉशिंग्टन एक्झामिनरच्या मते दानिश यांना स्पिन बोल्डक भागात वृत्तांकन करायचे असल्याने ते अफगाण नॅशनल ऑर्मीसोबत तेथे गेले होते. हा भाग पाकिस्तानच्या सीमेलगत असून तेथे तालिबान दहशतवादी लष्कराविरोधात सक्रीय झाले होते. दानिश एका चकमकीचे वृत्तांकन करत असताना त्यांना छर्रे लागले. त्यामुळे ते एका टीमसोबत स्थानिक मशिदीत गेले. तेथे त्यांना प्राथमिक उपचार मिळाले.

पण जेव्हा एक पत्रकार मशिदीत लपल्याची बातमी पसरली तसे तालिबानने सिद्दीकी मशिदीत असताना त्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तालिबानने दानिश यांना जिवंत पकडले. त्यांची ओळख पटवून घेतली व नंतर त्यांना अन्य काही जणांसोबत हाल करून ठार मारण्यात आले. दानिश आपल्या कमांडर व टीमच्या काही जणांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, या सर्वांनाही तालिबानने ठार मारले असे वॉशिंग्टन एक्झामिनरच्या वृत्तात म्हटले आहे.

अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिट्यूटचे एक सीनियर फेलो मायकल रुबीन यांनी दानिश यांच्या डोक्याला तालिबानकडून मारहाण करण्यात आली व नंतर त्यांच्या शरीरावर गोळ्या घालण्यात आल्या, असा एका सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे.

दानिश यांचा मृतदेह १८ जुलैला भारतात आणण्यात आला व जामिया मिलिया इस्लामियाच्या कबरस्तानात त्याचे दफन करण्यात आले.

दानिक सिद्दीकी हे मुळचे मुंबईचे रहिवासी होते. पण दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातून पदवी मिळवली होती. २००७मध्ये त्यांनी जामियातून मास कम्युनिकेशनचीही पदवी घेतली होती. नंतर २०१०मध्ये ते रॉयटर्समध्ये रुजू झाले होते.

दानिश सिद्दीकी कंदहारमध्ये अनेक दिवस मुक्काम टाकून होते. त्यांची एक बातमी प्रसिद्ध झाली होती. कंदहार जिल्ह्यात आक्रमक तालिबानने अफगाणिस्तान सैन्यादरम्यान घनघोर संघर्ष सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या हाताला गोळी लागल्याचेही त्यांनी रॉयटर्सला सांगितले होते. स्पिन बोल्डक येथून तालिबानची माघारी लक्षात आल्यानंतर हातावर इलाज केला असे त्यांनी रॉयटर्सला कळवले होते. पण नंतरच्या चकमकीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दानिश सिद्दीकी रॉयटर्सच्या भारतमधील मल्टिमीडिया टीमचे नेतृत्व करत होते. त्यांची भारतातील वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, कोरोना महासाथ, लॉकडाऊन संदर्भातील अनेक छायाचित्रे जगभरात वाखाण्यात आली होती.

कोरोनाच्या दुसर्या लाटेतील गंगा नदीच्या किनार्यावर जळत असलेल्या शेकडो मृतदेहांवरच्या अंत्यसंस्कारचे ड्रोन कॅमेराद्वारे घेतलेल्या छायाचित्रांनी जगभर खळबळ माजवली होती. या छायाचित्रांनी मोदी सरकारच्या कोरोना संदर्भातील दाव्यांमधील पोकळपणा जगापुढे आला होता.

पुलित्झर पुरस्कार

२०१८मध्ये म्यानमार सीमेवरील रोहिंग्या निर्वासितांच्या हालअपेष्टांचे त्यांनी केलेले वृत्तांकन जगभरात चर्चिले गेले. त्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला होता.

रॉयटर्स अगोदर त्यांनी द गार्डियन, न्यू य़ॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन टाइम्स, अल जझिरा व अन्य वृत्तसंस्थांसाठी काम केले होते. त्यांची छायाचित्रे अनेक देशी-विदेशी नियतकालिकांमध्ये, मासिकांमध्ये व वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती.

२०१०नंतर सिद्दीकी यांनी अफगाणिस्तान व इराकमध्ये युद्धवार्तांकन केले. नंतर ते रोहिंग्या निर्वासितांवरचे संकट, हाँगकाँगमधील चीनच्या सत्तेविरोधातील विद्यार्थ्यांची निदर्शने, नेपाळमधील भूकंप यांचेही वार्तांकन केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0