अफगाणिस्तानच्या आग्रेयकडील पाकतिका प्रांतात बुधवारी सुमारे ५.९ रिश्टर स्केलच्या भूकंपात १ हजाराहून अधिक नागरिक ठार व १३० हून अधिक नागरिक जखमी झाल्याचे
अफगाणिस्तानच्या आग्रेयकडील पाकतिका प्रांतात बुधवारी सुमारे ५.९ रिश्टर स्केलच्या भूकंपात १ हजाराहून अधिक नागरिक ठार व १३० हून अधिक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पाकतिका प्रांत हा अत्यंत दुर्गम समजला जातो. या भूकंपात १८०० हून अधिक घरेही उध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यातील ७० टक्के घरांचे नुकसान झाले आहेत. या भूकंपाचे धक्के जवळच्या पाकिस्तान व इराणमध्येही नोंदवले गेले आहेत. या देशांमध्ये मात्र कोणतीही मनुष्यहानी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पाकतिका प्रांतामध्ये मदतकार्य पाठवण्यास सुरूवात केली असून नजीकच्या गयान जिल्ह्यातून वैद्यकीय पथके भूकंपग्रस्त भागात पाठवण्यात आली आहेत. यूनिसेफने आपली १२ पथके घटनास्थळी पाठवली आहे.
तालिबान सरकारने आंतरराष्ट्रीय समुदायाकडेही मदतीची मागणी केली आहे. अफगाणिस्तानवर आर्थिक बंधने असल्याने सद्य परिस्थिती पाहून आंतरराष्ट्रीय समुदाय आम्हाला मदत व वैद्यकीय सामग्री देईल असा विश्वास तालिबानचे नेते अनस हक्कानी यांनी ट्विटद्वारे व्यक्त केला आहे.
COMMENTS