मुंबईः एल्गार परिषद व माओवाद्यांशी कथित संबंध प्रकरणातील आरोपींना स्वतःचे सरकार स्थापन करायचे होते व त्यांना देशाविरोधात युद्ध पुकारायचे होते, असे आरो
मुंबईः एल्गार परिषद व माओवाद्यांशी कथित संबंध प्रकरणातील आरोपींना स्वतःचे सरकार स्थापन करायचे होते व त्यांना देशाविरोधात युद्ध पुकारायचे होते, असे आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या आरोपपत्रात नमूद केले आहे. हे आरोपी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (माओवादी) सक्रीय सदस्य असल्याचाही दावा एनआयएचा आहे.
या ऑगस्ट महिन्यात एनआयएने आपला मसुदा न्यायालयात सादर केला होता, त्याच्या प्रती सोमवारी मिळाल्या आहेत, त्यात ही माहिती आढळून आली.
एल्गार परिषद प्रकरणात सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्झाल्विस, वरवरा राव, हनी बाबू, आनंद तेलतुंबडे, शोमा सेन, गौतम नवलखा, सुधीर धवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, अरुण फरेरा, रमेश गायचोर, ज्योती जगताप व सागर गोरखे या १५ आरोपींविरोधात १७ आरोप एनआयएने दाखल केले आहेत. त्यात यूएपीए व आयपीसी अंतर्गत अन्य आरोप आहेत. फादर स्टॅन स्वामी यांचेही आरोपींच्या यादीत नाव होते. पण त्यांचे गेल्या महिन्यात निधन झाले होते. एनआयएने ६ अन्य आरोपी फरार असल्याचेही म्हटले आहे.
या १५ आरोपींनी देशाविरोधात युद्ध पुकारले होते, त्यांना सशस्त्र संघर्ष करायचा होता, देशात क्रांती घडवून आणायची होती. भारत सरकार व महाराष्ट्राविरोधात त्यांना युद्ध पुकारायचे होते असा एनआयएचा दावा आहे. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर लघु नाटके, गाणी म्हणण्यात आली होती. नक्षलवाद्यांचे समर्थन करणारे साहित्य वाटप केले गेले, असेही एनआयएचे म्हणणे आहे. देशविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी या आरोपींनी जेएनयू, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थांची भरती केली होती, असेही एनआयएचे म्हणणे आहे.
देशाविरोधात युद्ध पुकारणार्या दोषींना देहदंडाची कायद्यानुसार शिक्षा आहे.
मूळ बातमी
COMMENTS