मुंबईः एल्गार परिषद प्रकरणात तळोजा कारागृहात असलेले फादर स्टॅन स्वामी (८३) यांना कारागृह प्रशासनाने स्ट्रॉ व सीपर दिल्याची माहिती शुक्रवारी स्वामी यां
मुंबईः एल्गार परिषद प्रकरणात तळोजा कारागृहात असलेले फादर स्टॅन स्वामी (८३) यांना कारागृह प्रशासनाने स्ट्रॉ व सीपर दिल्याची माहिती शुक्रवारी स्वामी यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला दिली.
गेल्या महिन्यात स्वामी यांनी स्ट्रॉ व सीपर द्यावे अशी मागणी तळोजा कारागृह प्रशासनाला केली होती पण तो त्यांना मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. अनेक आजार असल्याने फादर स्टॅन स्वामी यांची प्रकृती बरी नसते. त्यांना जेव्हा राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्याकडील सर्व वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. या वस्तूंमध्ये स्ट्रॉ व सीपर यांचा समावेश होता. तो आपल्याला द्यावा अशी मागणी स्वामी यांनी अनेकवेळा केली होती पण राष्ट्रीय तपास यंत्रणेने स्वामी यांच्या सर्व वस्तू जप्त केल्याने त्या वस्तू देता येत नाही, असे न्यायालयाला सांगितले होते. त्यावर स्वामी यांनी कारागृह प्रशासनाला एक पत्र लिहून आपल्याला या दोन वस्तू व थंडीचे कपडे द्यावेत अशी विनंती केली होती.
त्यानंतर काल शुक्रवारी स्वामी यांना त्यांनी मागितलेल्या वस्तू दिल्याचे सांगण्यात आले.
मूळ बातमी
COMMENTS