कल्याणारामन यांनी दिवंगत मुख्यमंत्री एम. के. करुणानिधी आणि अभिनेत्री-डॉक्टर शर्मिला यांचा अपमान करणारी ट्विट केल्याचा आरोप आहे.
ट्विटरवरील ‘अपमानजनक टिप्पण्यां’द्वारे सायबर छळ केल्याप्रकरणी चेन्नई पोलिसांनी १ ऑक्टोबरला भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य आर. कल्याणरामन अटक केली.
‘द न्यूज मिनिट’नुसार, कल्याणरामन यांनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी आणि अभिनेत्री शर्मिला यांचा अपमान करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. डीएमकेचे धर्मपुरीचे खासदार सेंथिलकुमार आणि विदुथलाई चिरुथैगल काची (व्हीसीके) पक्षाचे वकील मा गोपीनाथ यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या.
चेन्नई पोलिसांनी सांगितले की, ट्विटचे विश्लेषण केल्यानंतर, तक्रारदारांचा आरोप खरा असल्याचे आढळून आले आणि आरोपींच्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा दाखल करण्यात आला, असे एका ‘हिंदू’च्या बातमीमध्ये म्हटले आहे. भाजप नेत्याला विरुगंबक्कममधून उचलण्यात आले आणि नंतर त्याला दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर केले गेले आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
त्याच्याविरुद्धचा खटला भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ (अ) (विविध गटांमधील शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे) आणि ५०२ (२) (शत्रुत्व किंवा वाईट गोष्टींना प्रोत्साहन देणे) पोलीस कल्याणरामनचे ट्विटर अकाउंट बंद करण्यासाठी निर्णय घेऊ शकतात.
‘द न्यूज मिनिट’नुसार, भारतीय जनता मजदूर महासंघाचे माजी राष्ट्रीय सचिव असलेले कल्याणरामन यांना यापूर्वी दोनदा अटक करण्यात आली आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, भाजपच्या निवडणूक सभेत मुस्लिम समाजाला लक्ष्य करणाऱ्या केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध गुंडा कायदा लागू करण्यात आला होता, जो मद्रास उच्च न्यायालयाने नंतर रद्द केला. त्यांना २०१६ मध्ये अशाच प्रकारच्या टिप्पण्यांसाठी अटक करण्यात आली होती.
धर्मपुरीचे द्रमुकचे खासदार सेंथिलकुमार यांनी ‘द न्यूज मिनिट’ला सांगितले की कल्याणरामन हे “नेहमीचे गुन्हेगार आणि महिलांना छळणारे” आहेत. त्यांनी भाजपवर मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार नसल्याचा आरोप केला.
शर्मिला यांनी सांगितले की, भाजपचे कार्यकर्ते सोशल मीडियावर कसे वागतात याचे कल्याणरामन हे उदाहरण आहे. “जेव्हा ते वास्तुस्थितीला मान्य करू शकत नाहीत तेव्हा ते चारित्र्य हणण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटते की जर त्यांमुळे त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या स्त्रिया मागे हटतील. ही मानसिक धमकी आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “ते तुरुंगात राहण्यास पात्र आहे. मला वाटत नाही की त्यांना आधीच्या प्रकरणातही जामीन मिळायला हवा होता. असे लोक समाजासाठी विषारी असतात. ते महिलांना लक्ष्य करतात, धर्मावर आधारित विभागणी करतात. ”
COMMENTS