संसदीय समितीमार्फत फेसबुकची चौकशी व्हावीः काँग्रेस

संसदीय समितीमार्फत फेसबुकची चौकशी व्हावीः काँग्रेस

नवी दिल्लीः सार्वत्रिक निवडणुकांत फेसबुक या सोशल मीडिया कंपनीकडून मोठ्या प्रमाणात माहितीची हेराफेरी झाल्याचा आरोप करत काँग्रेसने फेसबुकची संसदेच्या सं

चिदंबरम यांची अटक २६ ऑगस्टपर्यंत टळली
राजस्थान- बसपा व्हीप काढू शकत नाहीः तज्ज्ञांचे मत
विरोधकांचा अभाव असता…

नवी दिल्लीः सार्वत्रिक निवडणुकांत फेसबुक या सोशल मीडिया कंपनीकडून मोठ्या प्रमाणात माहितीची हेराफेरी झाल्याचा आरोप करत काँग्रेसने फेसबुकची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या मागणीबरोबर काँग्रेसने फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांना एक पत्र लिहून फेसबुक हे द्वेषयुक्त, शिवराळ भाषेला (‘हेट स्पीच’), अपप्रचाराला, बनावट-खोट्या बातम्या पसरवण्यास मदत करते. ही कंपनी फक्त भाजपला मदत करत असून अन्य पक्षांशी पक्षपात करत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे सोशल मीडिया विभागाचे प्रमुख रोहन गुप्ता व प्रवीण चक्रवर्ती यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेऊन फेसबुकवर हल्ला केला. रोहन गुप्ता यांनी फेसबुकच्या भारतातील कारभाराबाबत सखोल चौकशी व्हावी, यासाठी संसदेची संयुक्त समिती स्थापन करावी अशीही मागणी केली आहे.

भाजप फेसबुकचा एक अस्त्र म्हणून वापर करत आहे. या अस्त्राद्वारे विद्वेषयुक्त, मत्सरयुक्त, समाजात दुही पसरवणारे मजकूर, खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, असेही काँग्रेसने फेसबुकवर आऱोप केले आहेत.

रोहन गुप्ता यांनी आपल्या पत्रात सोशल मीडिया कंपनी फेसबुकच्या माध्यमातून भारतात ज्या पद्धतीने अपप्रचार, खोट्या बातम्या, शिवराळ, मत्सरयुक्त मजकूर पसरत आहे, त्याला आवर घालण्याचे काम केवळ आणि केवळ मार्क झकरबर्गच करून शकतात, त्यांनी या सगळ्यांची जबाबदारी घेतली पाहिजे, भारतीय ग्राहकांचा विश्वास त्यांनी कमावला पाहिजे, भारतातल्या फेसबुक कर्मचार्यांची कंपनीने अंतर्गत चौकशी केली पाहिजे, अशीही मागणी केली आहे.

फेसबुक व व्हॉट्सअपद्वारे विद्वेषयुक्त मजकूर पसरण्यामागे एक कारण फेसबुकने आपल्या कंपनीच्या खर्चात व कर्मचार्यांच्या संख्येत कपात केली आहे. फेसबुक विद्वेषयुक्त मजकूर रोखण्यासाठी एकूण कंपनी खर्चातील ९ टक्के रक्कम वापरते, त्याचा परिणाम उलटा होऊन हिंदी भाषिक पट्ट्यात विद्वेषाचे, मत्सराचे मजकूर पसरले जात आहेत आणि हे रोखण्यात फेसबुक असमर्थ ठरल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे.

काँग्रेसच्या टेक्नॉलॉजी अँड डेटा सेलचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उपयोग फेसबुकने भाजपला करून दिला असा आरोप केला. पुलवामा हल्ला झाल्यानंतर फेसबुकवर मरण पावलेल्यांचे फोटो वेगाने पसरले गेले. एखादी व्यक्ती जी सर्वसाधारण फेसबुक वापरते तिने तिच्या आयुष्यात जेवढ्या मरण पावलेल्या व्यक्ती पाहिल्या नाहीत, त्यापेक्षा कित्येक पट मृत व्यक्ती फेसबुकवर त्या दिवशी पाहिल्याचा दावा चक्रवर्ती यांनी केला. फेसबुक व व्हॉट्सअप या अमेरिकी कंपन्यांनी भारतीय लोकशाहीच्या मूल्यांवर हल्ला केला. त्यांना गुंडाळून ठेवले. हा मुद्दा केवळ काँग्रेस व भाजप असा नाही तर देशाची लोकसंख्या या कंपनीने धोक्यात आणली. त्या कंपनीची चौकशी संसदेच्या संयुक्त समितीद्वारे केली पाहिजे, अशी मागणी चक्रवर्ती यांनी केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0