चीनचाच भारताला खरा धोकाः रावत

चीनचाच भारताला खरा धोकाः रावत

नवी दिल्लीः भारताच्या सुरक्षिततेचा विचार केल्यास चीनचाच भारताला सर्वात मोठा धोका असल्याचे मत तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी ए

अमेरिका आणि खडाखडी
बीबीसी वर्ल्ड न्यूजवर चीनमध्ये बंदी
सार्वजनिक आरोग्य आणि कोकाकोलाचे हितसंबंध

नवी दिल्लीः भारताच्या सुरक्षिततेचा विचार केल्यास चीनचाच भारताला सर्वात मोठा धोका असल्याचे मत तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले.

ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार रावत म्हणाले, भारत व चीन दरम्यान सीमावादावर १३ बैठका आजपर्यंत झाल्या आहेत. पण त्यातून ठोस असा तोडगा निघालेला नाही. त्यात गलवान खोर्यातील चीनच्या घुसखोरीनंतर भारताचे हजारो सैनिक व शस्त्रास्त्र चीनच्या सीमेरेषेवर तैनात केले असूनही हे सैन्य माघारी येईल अशी शक्यताही सध्या दिसत नाही. भारत व चीन हे दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्याने दोघांमध्ये चर्चेच्या १३ फेर्या होऊनही उभय देशांमधील तणाव व संशय निवळलेला नाही. दोन्ही देशांमध्ये सैन्य मागे घेण्यावरून अंतिम असा निर्णय होताना दिसत नाही. ही परिस्थिती पाहता भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चीनचा खरा धोका आहे, असे रावत म्हणाले.

रावत यांचे विधान अशा पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरत आहे की, चीनने भारतीय सीमेचे उल्लंघन करत भारतीय हद्दीत अनेक ठिकाणी बांधकामे केली आहेत. काही ठिकाणी गावेही वसवली आहेत. अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा चीनने बदलण्याचे प्रयत्न केले असून चीन सरकार वादग्रस्त सीमारेषांवर गावे वसवून तेथे आपले सैन्य तैनात करण्याचे अथवा नागरी वस्त्या उभ्या करण्याचे प्रयत्न आक्रमकपणे करताना दिसत आहे.

रावत यांनी तालिबानचाही भारताला धोका असल्याचे प्रतिपादन केले आहे. जम्मू व काश्मीरमधील दहशतवाद्यांना तालिबानकडून शस्त्रास्त्रांची मदत होण्याची शक्यता असून त्यांच्याकडून काश्मीरमधील दहशतवादाला समर्थनही मिळण्याची भीती रावत यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: