दोन सत्ताधीशांसाठी तैवान मुद्दा कळीचा

दोन सत्ताधीशांसाठी तैवान मुद्दा कळीचा

अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची होती. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये कोणता संवाद साधला जातो तसेच त्यांची धोरणे कोणती आहेत यावरच त्याचे फलित अवलंबून आहे. ही बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात आणि कोणत्याही वादविवादा व्यतिरिक्त पार पडली.

जाहीर चर्चांची पुस्तकं
अल-काइदाचा प्रमुख अल-जवाहिरी ठार
प्रवास खडतर असला तरीही मी आशावादी!

ना ना म्हणता म्हणता जगातील दोन महासत्ताधीशांमध्ये आभासी पद्धतीने संवाद साधला गेला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यातील हा संवाद तब्बल ३ तास २४ मिनिटे चालला. संपूर्ण जगाचे या आभासी भेटीकडे लक्ष लागले होते. कारण ही आभासी भेट होत असतानाच जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्र म्हणून चीनचे नाव समोर आले आहे. एकीकडे महासत्ताधीश म्हणून अमेरिकेचे जगावर वर्चस्व होते. जागतिक घडामोडींचे युरोप हे कायम सत्ता केंद्र राहिले असताना आता गेल्या काही काळात हे सत्ता केंद्र आशियाई देशाकडे झुकले आहे. या पार्श्वभूमीवर या दोन दिग्गज नेत्यांची पहिल्यांदाच झालेली ही आभासी चर्चा बदलत्या समीकरणाची नांदी ठरणार आहे.

या आभासी बैठकीच्या सुरुवातीला बायडन यांनी स्पष्ट केले होते की, चीन आणि अमेरिकेचे सर्वोच्च नेते असल्याच्या नात्याने आपली जबाबदारी आहे की, दोन्ही देशांमधील स्पर्धा ही निकोप व्हावी, मैत्रीपूर्ण असावी. यामुळे कोणतेही तणाव, संघर्ष निर्माण होऊ नये. तर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी बायडन यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देताना दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

शी जिनपिंग यावेळी म्हणाले की बायडन हे माझे जुने मित्र आहेत.आणि त्यांच्या सोबत काम करण्यासाठी, तसेच आम्हा दोघांमध्ये एकमत होण्यासाठी आणि योग्य पावले उचलण्यासाठी आपण तयार आहोत. अर्थात शी जिनपिंग यांनी केलेले हे वक्तव्य पाहता सद्यस्थितीमध्ये त्यांना अमेरिकेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुळातच अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची होती. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये कोणता संवाद साधला जातो तसेच त्यांची धोरणे कोणती आहेत यावरच त्याचे फलित अवलंबून आहे. ही बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात आणि कोणत्याही वादविवादा व्यतिरिक्त पार पडली. गेल्या काही काळामध्ये बिघडत असलेल्या संबंधांबाबत अमेरिका आणि चीन यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला गेला. तैवानपासून ते अगदी कोरोनापर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी अमेरिका-चीन यांच्यातील स्पर्धा ही संघर्षात रुपांतरीत होऊ नये यावर जादा भर दिला.

या बैठकीमध्ये तैवान, हाँगकाँग आणि शिनजियांग प्रांतात चीन करत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा बायडन यांनी काढला. तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना अर्थात चीनमधील सत्ताधारी पक्षाकडून शिनजियांग, तिबेट आणि हाँगकाँगमध्ये केल्या जात असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाविषयी अमेरिकेने चिंता व्यक्त केली. तैवानच्या पट्ट्यामध्ये अशांतता आणि अस्थैर्य निर्माण करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला अमेरिकेचा ठामपणे विरोध असेल असे बायडन यांनी स्पष्टपणे सांगितले. यावर जिनपिंग यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे तैवानचा मुद्दा हा त्या बैठकीमधील कळीचा मुद्दा ठरला.

यापूर्वी बायडन यांनी चीनमध्ये उघूर मुस्लिमांवर होत असलेला अन्याय, मानवाधिकाराच्या अधिकाराचे उल्लंघन, हाँगकाँगमध्ये लोकशाही मार्गाने होणाऱे आंदोलन चिरडणे, तैवानविरोधात लष्करी कारवाई इत्यादी मुद्द्यांवर चीनला आतापर्यंत खूप वेळ सुनावले आहे. तर जिनपिंग यांनी बायडेन यांच्या प्रशासनावर निशाणा साधताना चीनच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. त्यामुळे या बैठकीत त्याचे पडसाद उमटण्याची जास्त शक्यता होती. हे दोन्ही सर्वोच्च नेते आपला अहंकार बाजूला ठेवून एकमेकांशी बोलणार की नाही या बाबत अनेक जण साशंक होते. पण हे दोन सताधीश आभासी पद्धतीने एकमेकांना भेटून त्याच्यात किमान सुसंवाद झाला हेही नसे थोडके.

ओंकार माने, जागतिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0