मुंबईः महानगर मुंबईत गुरूवारी कोरोनाची लागण झालेले २०,१८१ नवे रुग्ण आढळले. ही टक्केवारी बुधवारी आढळलेल्या एकूण रुग्ण संख्येच्या २५ टक्के अधिक असून गुर
मुंबईः महानगर मुंबईत गुरूवारी कोरोनाची लागण झालेले २०,१८१ नवे रुग्ण आढळले. ही टक्केवारी बुधवारी आढळलेल्या एकूण रुग्ण संख्येच्या २५ टक्के अधिक असून गुरुवारी ४ कोरोना लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला.
कोरोनाचा संसर्ग धारावी, दादर, माहिम या उपनगरात वेगाने वाढला असून धारावीत २४ तासांत १०७, दादरमध्ये २२३ व माहिममध्ये ३०८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान कोविड-१९ आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत फक्त ऑनलाइन पद्धतीने सुरू राहतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून केली.
उदय सामंत यांनी कोविड-१९ व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ/महाविद्यालयीन परीक्षा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे लसीकरणाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) राज्यातील विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, अकृषि विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासमवेत कोविड-१९ परिस्थितीची मंगळवारी आढावा बैठक घेतली.
COMMENTS