मुंबई: देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, भाजपचे ज्येष्ठ नेते व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, गीता प्रेसचे अध्यक्ष
मुंबई: देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, भाजपचे ज्येष्ठ नेते व उत्तर प्रदेशचे

सायरस पुनावाला
माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, गीता प्रेसचे अध्यक्ष राधेश्याम खेमका या तिघांना २०२२ चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मविभूषण’, उद्योग व
व्यापार क्षेत्रातील कामगिरीसाठी सायरस पुनावाला आणि नटराजन चंद्रशेखरन यांना ‘पद्मभूषण’, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. हिम्मतराव बावसकर, डॉ. भीमसेन

ले. जनरल माधुरी कानिटकर (सेवानिवृत्त)
सिंगल, डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर) यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी, सुलोचना चव्हाण आणि सोनू निगम यांना कलाक्षेत्रातील कार्यासाठी, अनिलकुमार राजवंशी यांना विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाले आहेत.
मंगळवारी जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्यनारायण नडेला, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, प्रसिद्ध अभिनेते व्हिक्टर बॅनर्जी व मधुर जाफरी, शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांना पद्मभूषण तर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, प्रमोद भगत, वंदना कटारिया, गायक सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

डॉ. प्रभा अत्रे
यंदा एकूण ४ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण व १०७ पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
ले. जनरल माधुरी कानेटकरांना परम विशिष्ट सेवा पदक
मंगळवारी राष्ट्रपतींनी लष्कराच्या सेनाधिकारी व महाराष्ट्राच्या ले. जनरल माधुरी कानिटकर (सेवानिवृत्त), ले. जनरल मनोज पांडे तसेच नौदलाचे व्हॉईस ॲडमिरल सतिशकुमार घोरमाडे यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’ जाहीर केले. त्याच बरोबर मूळचे महाराष्ट्राचे असलेल्या अन्य ११ अधिकारी व

ले. जनरल मनोज पांडे
जवानांना ‘शौर्य पदक’ जाहीर करण्यात आली आहेत.
राष्ट्रपतींनी लष्कराच्या एकूण ३१७ आणि नौदलाच्या एकूण ३४ सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘शौर्य पदक’ जाहीर केले. या पदकांमध्ये २२ ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (पीव्हीएसएम), ४ ‘उत्तम युद्ध सेवा पदक’ (युवायएसएम), ४० ‘अती विशिष्ट सेवा पदक’(एव्हीएसएम), ६ ‘शौर्य चक्र’, ८४ ‘सेना पदक’ (शौर्य), १० ‘युद्ध सेवा पदक’, ४० ‘सेना पदक’ (विशिष्ट सेवा), ९३ ‘विशिष्ट सेवा पदक’ तसेच लष्कराच्या विविध ऑपरेशनसाठी ४४ पदक आणि नौदलाच्या ८ नौसेना पदकांचा समावेश आहे.
COMMENTS