५ वर्षांत गरीबांच्या उत्पन्नात ५३ टक्क्यांनी घट

५ वर्षांत गरीबांच्या उत्पन्नात ५३ टक्क्यांनी घट

नवी दिल्लीः आर्थिक उदारीकरणाच्या तीन दशकानंतर पहिल्यांदाच देशातील सर्वात गरीब असलेल्या २० टक्के कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न घटले असून गेल्या ५ वर्षांती

रायगडमधील ‘बल्क ड्रग पार्क’ गुजरातमध्ये गेलाः आदित्य ठाकरे
धुमसता पंजाब
रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याची सुनावणी पूर्ण

नवी दिल्लीः आर्थिक उदारीकरणाच्या तीन दशकानंतर पहिल्यांदाच देशातील सर्वात गरीब असलेल्या २० टक्के कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न घटले असून गेल्या ५ वर्षांतील ही सर्वात मोठी म्हणजे ५३ टक्के घसरण असल्याचे दिसून आले आहे. तर देशातील सुमारे २० टक्के श्रीमंताच्या वार्षिक उत्पन्नात ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हे आकडे मुंबईस्थित पीपल्स रिसर्च ऑन इंडियाज कन्झ्यूमर इकॉनॉमी (पीआरआयसीई) या विचारगटाकडून प्रसिद्ध झाले आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या संस्थेने एप्रिल ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान पहिल्या टप्प्यात देशातील २ लाख घरे व नंतर ४२ हजार घरांची माहिती मिळवली. ही माहिती देशातील १०० जिल्हे, १२० शहरे व ८०० गावांतील मिळवली आहे.

या आकडेवारीनुसार देशातील गरीब वर्ग अधिक गरीब झाला असून श्रीमंत अधिक श्रीमंत होत असल्याचे दिसून आले आहे. त्याच बरोबर कोरोना महासाथीमुळे शहरातील गरीबांची परिस्थिती अधिक बिकट झाली असून त्यांचे उत्पन्नही घटल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात गरीबी वाढत असून लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांच्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरामुळे त्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचे दिसून आले आहे.

२०१५-१५ या वर्षाच्या तुलनेत २०२०-२१मध्ये गरीब वर्गाच्या उत्पन्नात ५३ टक्क्याने घट झाली आहे. १९९५ नंतर उत्पन्नात सतत वाढ होत होती.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0