गुलजार अहमद पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

गुलजार अहमद पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

नवी दिल्लीः नवे सरकार सत्तेवर येईपर्यंत पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश गुलजार अहमद यांच्याकडे पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून सूत्रे देण्यात आली

डोवल, रावत, मिश्रांची विधाने लोकशाहीचे विदारक चित्र!
दिशा रवी टूलकिट : पोलिसांकडे एकही पुरावा नाही
सुवर्णवेध

नवी दिल्लीः नवे सरकार सत्तेवर येईपर्यंत पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश गुलजार अहमद यांच्याकडे पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून सूत्रे देण्यात आली आहेत. सोमवारी विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनी अहमद यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे दिली. त्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी तशी अधिसूचनाही जारी केली आहे.

रविवारी अल्वी यांनी पंतप्रधान इम्रान खान व प्रमुख विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांना एक पत्र लिहून काळजीवाहू पंतप्रधानपदाची नावे सूचवण्यास सांगितले होते. या पत्रात राष्ट्रीय संसद व केंद्रीय मंत्रिमंडळ भंग करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले होते. संसद भंग झाल्यानंतर तीन दिवसांत काळजीवाहू पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित न झाल्यास संसद सभापतींच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यांची दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी असलेली एक समिती नेमण्यास सांगण्यात आले होते. या समितीत सत्ताधारी व विरोधी पक्षांचे सदस्य समान संख्येचे सामील करण्यात आले होते.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: