इम्रान खान सरकारला अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागणार

इम्रान खान सरकारला अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागणार

इस्लामाबादः पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान सरकारला गुरुवारी जबर धक्का दिला. न्यायालयाने इम्रान खान सरकार विरोधात अविश्वासाच्या ठरावावरच

शांघाय कॉर्पोरेशन बैठकीसाठी इम्रान खानला निमंत्रण
इम्रान खान सरकारवर अविश्वासाचा ठराव; पक्षात बंडखोरी
आहे खरे जरी काही, परि तू जागा चुकलासि

इस्लामाबादः पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान सरकारला गुरुवारी जबर धक्का दिला. न्यायालयाने इम्रान खान सरकार विरोधात अविश्वासाच्या ठरावावरचे मतदान नॅशनल असेंब्लीत घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने इम्रान खान सरकार पुन्हा पेचात सापडले आहे.

काही दिवसांपूर्वी अविश्वासाचा ठराव बेकायदा ठरवत इम्रान खान यांनी नव्याने निवडणुका घेण्याचा निर्णय घोषित करत स्वतःला अविश्वासाच्या ठरावाला सामोरे जाण्यापासून वाचवले होते. पण आता सर्वोच्च न्यायालयाने अविश्वास ठरावाचा प्रस्ताव रद्द करण्याचा नॅशनल असेंब्लीतील उपसभापतींचा निर्णयही घटनाबाह्य ठरवल्याने इम्रान खान सरकार संकटात सापडले आहे. ९ एप्रिलला १० वाजता नॅशनल असेंब्लीचे विशेष सत्र बोलावण्याचे आदेश सरन्यायाधीशांनी दिले आहे. याच दिवशी चर्चा न करतो मतदान घ्यावे असे न्यायालयाचे म्हणणे आहे.

बुधवारच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या विरोधात परदेशी कटकारस्थान असल्याचा इम्रान खान सरकारच्या दाव्यावर माहितीही मागितली होती. न्यायालयाने राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत झालेल्या बैठकीतील विस्तृत माहिती मागितली. त्यानंतर गुरुवारी अविश्वासाच्या ठरावावर मतदान घेण्याचे आदेश दिले.

गुरुवारच्या या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0