इस्लामाबादः पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभा निवडणुकांत २३ जागांपैकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘तहरीक-ए-इन्साफ’ (पीटी
इस्लामाबादः पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभा निवडणुकांत २३ जागांपैकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘तहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाने १० जागा जिंकल्या असून एका जागेवर या पक्षाने आघाडी घेतली आहे. इम्रान यांच्या या पक्षाच्या या विजयावर पाकिस्तानातील सर्व विरोधी आक्षेप घेत निवडणुकांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.
भारताने या पूर्वीच या निवडणुकांवर आक्षेप घेतला होता. पाकिस्तानने गिलगिट-बाल्टीस्तान प्रदेश कब्जा केला असून अशा निवडणुका घेऊन पाकिस्तान या प्रदेशांवर राजकीय व भौगोलिक अंकुश ठेवत असल्याचा आरोप भारताने केला होता.
अनेक वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार पीटीआयने ८ जागांवर विजय मिळवला आहे. पण पीटीआयला बहुमत मिळालेले नाही. या निवडणुकात ६-७ अपक्ष उमेदवार निवडून आले असून या अपक्षांच्या मदतीने इम्रान खान यांचा पीटीआय पक्ष सत्ता स्थापन करू शकतो.
या निवडणुकात पाकिस्तान मुस्लिम लीग -नवाज पक्षाने २, जमियत उलेमा-ए-इस्लाम फडल व मजलिस वहदतुल मुस्लिमीन यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
मूळ बातमी
COMMENTS