म. प्रदेश दंगलीतील संशयितांची घरे बुलडोझरद्वारे जमीनदोस्त

म. प्रदेश दंगलीतील संशयितांची घरे बुलडोझरद्वारे जमीनदोस्त

नवी दिल्लीः म. प्रदेशातील खरगौनमध्ये राम नवमीच्या दिवशी उसळलेल्या हिंदु-मुस्लिम दंगलीतील ४५ संशयितांच्या घरावर मंगळवारी बुलडोझर फिरवण्यात येऊन त्यांची

भीमा-कोरेगांव दंगल खटल्यातून संभाजी भिडेंचे नाव वगळले
‘पिगॅससची खरेदी इस्रायलशी झालेल्या कराराचा भाग’
‘मंदिरातील प्रसादावर, त्या दिवस ढकलत आहेत’

नवी दिल्लीः म. प्रदेशातील खरगौनमध्ये राम नवमीच्या दिवशी उसळलेल्या हिंदु-मुस्लिम दंगलीतील ४५ संशयितांच्या घरावर मंगळवारी बुलडोझर फिरवण्यात येऊन त्यांची घरे उध्वस्त करण्यात आली. ही सर्व घरे मुस्लिम समुदायाची आहेत.

१० एप्रिलला राम नवमी मिरवणुकांच्या निमित्ताने खरगौनमधील तीन भागांमध्ये दगडफेक व हिंसाचार दिसून आला. यात पोलिसांनी ८० संशयितांना अटक केली असून मंगळवारी प्रशासनाने संशयित आरोपींची दुकाने, घरे बुलडोझर लावून जमीनदोस्त केली. या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने अशा कारवाईमागे कायद्याचे पालन केले गेले आहेत का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

द हिंदूने या संदर्भात इंदोरचे विभागीय आयुक्त पवन शर्मा यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात ४५ संशयितांच्या मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या. तर टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात हा आकडा ५० इतका आहे. प्रत्यक्षात हा आकडा अधिक असल्याची शक्यता आहे.

पवन शर्मा यांनी या कारवाईचे समर्थन करताना संशयित आरोपींनी अतिक्रमण करून जागा मिळवल्या होत्या, त्या जमीनदोस्त कायद्यातील तरतुदीनुसार करण्यात आल्याचे सांगितले.

पण प्रशासनाने अशी कारवाई करण्याआधी न्यायालयाची संमती घेतली नव्हती असेही दिसून आले. त्यावर शर्मा यांनी अतिक्रमण बांधकामे पाडण्यासाठी कायदा पुरेसा असल्याचे सांगितले. आरोपींच्या मनात भय निर्माण व्हावे म्हणून अशा कारवाया कराव्या लागतात असे शर्मा म्हणाले.

मुस्लिमांनीच दंगल घडवलीः राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

दरम्यान खरगौन येथील दंगल मुस्लिमांनीच घडवून आणली असा आरोप राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केला आहे. मिश्रा यांनी संशयित आरोपींच्या घरांवर चालवलेल्या बुलडोझर कारवाईचेही समर्थन केले. मुस्लिम असेच हल्ले करत राहतील तर त्यांनी न्यायाची अपेक्षाही धरू नये. सीसीटीव्हीत जेवढे संशयित आढळले आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली. जमावाने जिल्हा पोलिसप्रमुखांवर गोळी झाडली, काही जण गंभीर जखमी आहेत, असेही मिश्रा म्हणाले.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0