औरंगजेबच्या कबरीचा परिसर ५ दिवसांसाठी बंद

औरंगजेबच्या कबरीचा परिसर ५ दिवसांसाठी बंद

औरंगाबादः शहरानजीक खुल्दाबाद येथील मुघल सम्राट औरंगजेबचे कबरीचे ठिकाण पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व खात्याने गुरुवारी घेतला. महार

लेफ्टिस्ट सुफी सईद मिर्झा
हिंदुत्ववाद्यांनी रणबीर-अलियाला मंदिरात प्रवेश करण्यापासून अडवले
काश्मीरात पोलिसांच्या बसवर हल्ला, २ पोलिस ठार

औरंगाबादः शहरानजीक खुल्दाबाद येथील मुघल सम्राट औरंगजेबचे कबरीचे ठिकाण पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व खात्याने गुरुवारी घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी औरंगजेबच्या कबरीची गरजच काय ती उध्वस्त करायला हवे असे ट्विट केले होते. यानंतर खुल्दाबाद मशिद समितीने कबरीचा परिसर बंद करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यात हस्तक्षेप करत भारतीय पुरातत्व खात्याने हे ठिकाण ५ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.

गेले काही दिवस औरंगजेबच्या कबरीवरून वातावरण तापवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयएमचे नेते अकबुरुद्दीन ओवेसी यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबच्या कबरीला भेट दिली होती. या भेटीनंतर कट्टर हिंदुत्ववादी संघटनांकडून वातावरण तापवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय? जमीनदोस्त करा हे थडगं, म्हणजे या अवलादी तिथे माथा टेकायला येणार नाहीत.. असे ट्विट केले होते. हे ट्विट एमआयचे नेते ओवेसी यांना उद्देशून करण्यात आले होते.

या ट्विटनंतर मशीद कमिटीने औरंगजेबच्या कबरीचा परिसर बंद करण्याचे प्रयत्न सुरू केले त्या आधी भारतीय पुरातत्व खात्याने आपले सुरक्षा दल घटनास्थळी तैनात केले होते.

या संदर्भात भारतीय पुरातत्व खात्याचे औरंगाबाद मंडळाचे अधिक्षक मिलन कुमार चौले यांनी पीटीआयला सांगितले की, काही दिवसांपूर्वी मशीद कमिटीने हा भाग बंद करण्याचा प्रयत्न केला होता. पण पुरातत्व खात्याने कबरीचा परिसर खुला केला होता. पण बुधवारी आम्ही पाच दिवसांसाठी संपूर्ण परिसर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या काळात परिस्थिती पाहण्यात येईल व त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0