तिस्ता, श्रीकुमार यांना २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

तिस्ता, श्रीकुमार यांना २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

अहमदाबादः २००२च्या गुजरात दंगल प्रकरणात खोटे साक्षीदार उभे करून निर्दोष व्यक्तींना फसवण्याच्या आरोपावरून रविवारी अटक केलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या

अमित शहांच्या सभेत ‘गोली मारों..’च्या घोषणा
सेंट पीटर्सबर्ग कामगारांची त्सारला याचिका, २२ जानेवारी १९०५
कर्ज नव्हे, पैसे द्या – राहुल गांधी

अहमदाबादः २००२च्या गुजरात दंगल प्रकरणात खोटे साक्षीदार उभे करून निर्दोष व्यक्तींना फसवण्याच्या आरोपावरून रविवारी अटक केलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या व पत्रकार तिस्ता सेटलवाड व गुजरातचे माजी पोलिस महानिरीक्षक आर. बी. श्रीकुमार यांना २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तिस्ता सेटलवाड व श्रीकुमार पोलिसांना सहकार्य करत नसल्याने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी न देता पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी गुजरात पोलिसांनी केली असता अहमदाबाद येथील स्थानिक न्यायालयाने सेटलवाड व श्रीकुमार यांना २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

२५ जूनला गुजरात एटीएसने मुंबईतून सेटलवाड यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली व त्यांना अहमदाबाद येथे नेण्यात आले. या प्रवासादरम्यान पोलिसांनी आपल्याला शारीरिक इजा केली असा आरोप सेटलवाड यांनी केला. सेटलवाड यांचा ताबा अहमदाबाद क्राइम ब्रँचकडे सध्या असून त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.

अहमदाबाद क्राइम ब्रँचने सेटलवाड, श्रीकुमार व संजीव कुमार भट्ट यांच्याविरोधात २००२च्या गुजरात दंगल प्रकरणात खोटे पुरावे सादर करून कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याची फिर्याद दाखल केली आहे. या तिघांवर भारतीय दंड संहितेअंतर्गत कलम ४६८, ४७१, १२०ब, १९४, २११ व २१८ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

या तिघांची चौकशी एसआयटी करणार आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0