शिवसेनेत खासदार बंडाच्या पवित्र्यात

शिवसेनेत खासदार बंडाच्या पवित्र्यात

मुंबईः शिवसेनेतील बंडाळी सोमवारी अधिक उफाळून आल्याचे दिसून आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम व आनंदराव अडसूळ य

कोरोनाच्या महासंकटात शहांनी फुंकले निवडणुकांचे बिगुल
कोविड-१९चा पहिला ऑटोप्सी अहवाल काय सांगतो?
बिहारमध्येही आमचं ठरलंय, महगठबंधनचं जमलंय?

मुंबईः शिवसेनेतील बंडाळी सोमवारी अधिक उफाळून आल्याचे दिसून आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम व आनंदराव अडसूळ या दोघांना पक्षातून निलंबित केले. तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.

रामदास कदम यांची हकालपट्टी होण्याआधी त्यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी पूर्वीच्या युती सरकारमध्ये पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहिले होते. काही महिन्यांपासून पक्षातून बाजूला सारल्यामुळे ते नाराज होते.

खासदारही बंडाच्या तयारीत

४० आमदारांनी जसे बंड केले तसे लोकसभेतल्या १२ खासदारही शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले असून बुधवारी अपात्र आमदारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या आधी खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता अनेक माध्यमांनी वर्तवली आहे.

लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते राहुल शेवाळे व प्रतोद भावना गवळी राहतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे गटाची नवी राष्ट्रीय कार्यकारणी

दरम्यान सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करत नव्या कार्यकारणीची घोषणा केली. या कार्यकारिणीत शिंदे यांचे नाव शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून जाहीर करण्यात आले असून पक्षाच्या प्रवक्तेपदी दीपक केसरकर यांची निवड झाली आहे. आढळराव पाटील यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0