संजय राऊत यांना ईडीकडून अटक

संजय राऊत यांना ईडीकडून अटक

मुंबई: ९ तासांची घरी आणि ८ तासांच्या ईडी कार्यालयातील चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) रात्री पावणे एक वाजता अटक के

‘भाजपच्या १२१ नेत्यांची फाईल ईडीला सोपवू’
ईडीचे गुन्हे असल्याने सिद्दिक कप्पन अजूनही तुरुंगातच
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक

मुंबई: ९ तासांची घरी आणि ८ तासांच्या ईडी कार्यालयातील चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) रात्री पावणे एक वाजता अटक केली. त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी अटक केल्याचे सांगितले.

सुनील राऊत म्हणाले, “खोटी कागदपत्रे बनवून संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. ज्या गोष्टींचा काही संबंध नाही, अशा गोष्टींचा पुरावा दाखवून केस तयार करण्यात आली आहे. आम्ही न्यायालयीन लढाई लढण्यास तयार आहोत.”

संजय राऊत यांना संध्याकाळी साडेचार वाजता त्यांच्या घरून ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची कार्यालयात चौकशी करण्यात आली आणि रात्री अटक करण्यात आली. रात्रीही ईडीच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमले होते. मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आणि गाडीत घालून त्यांना ईडी कार्यालयामध्ये नेले. गाडीत बसण्यापूर्वी संजय राऊत यांनी शिवसैनिकांना गाडीवर उभे राहून अभिवादन केले. शिवसैनिकांनी रस्त्यावर आडवे गाडी बाहेर जाण्यास विरोध केला. मात्र पोलिसांनी शिवसैनिकांना बाजूला केले.

सक्तवसूली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी आज संजय राऊत यांच्या घरी मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी सकाळी साडेसात वाजता पोहोचले होते. राऊत यांच्या घराची तपासणी संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. राऊत यांनी जाताना गाडीतून उभे राहून शिवसैनिकांना लढण्याचा इशारा केला होता.

खोटे पुरावे तयार करण्यात येत आहेत. राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. संजय राऊत झुकणार नाही. महाराष्ट्र कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर दिली होती.

सुनील राऊत म्हणाले, की ईडीने आम्हाला कोणतीही कागदपत्रे दाखवलेली नाहीत. त्याबद्दल न्यायालयातच समजेल.

२० जुलै आणि २७ जुलै रोजी असे दोनदा समन्स चुकवल्यानंतर ईडीचे तपासकर्ते आज सकाळी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. मुंबईतील चाळीच्या पुनर्विकासासंदर्भात एजन्सीला त्यांची चौकशी करायची आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले राऊत यांनी कोणत्याही भ्रष्टाचार केल्याचे नाकारले आहे आणि राजकीय सूडबुद्धीने त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0