जम्मू व काश्मीरमधील बकरवाल समाजाला काश्मीर खोऱ्यातून हुसकावण्यासाठी एक मोठे कारस्थान रचले गेले. त्यात एका आठ वर्षांच्या चिमुरड्या मुलीला लक्ष्य करून त्याला हिंदू-मुस्लिम असा रंग दिला गेला.
गेल्या वर्षी जम्मू व काश्मीरमधील कथुआ येथील एका आठ वर्षाच्या मुलीवर गँगरेप करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी सोमवारी पठाणकोट जिल्हा न्यायालयाने सहा आरोपींपैकी तीन आरोपींना जन्मठेप तर तिघांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली. जन्मठेप सुनावलेल्या आरोपींची नावे सांझी राम, दीपक खजुरिया व परवेश कुमार अशी असून त्यांच्यावर ३०२ (खून), ३७६ ड (सामूहिक बलात्कार) व १२० ब (गुन्हेगारी कटकारस्थान) ही कलमे लावण्यात आली होती. त्यानुसार त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या तिघांना गँगरेप केल्याप्रकरणी २५ वर्षे कारावास व प्रत्येकी १ लाख रुपयाचा दंडही न्यायालयाने सुनावला. त्याचबरोबर पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यांची नावे आनंद दत्ता, तिलक राज व सुरेंदर वर्मा अशी आहेत. विशाल जंगोत्रा या सातव्या आरोपीची पुराव्याअभावी सुटका झाली.
जिल्हा न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व आम्हाला न्याय हवा अशी मागणी केली.
या प्रकरणाचा इतिहास
कथुआ बलात्कार प्रकरणाची पार्श्वभूमी सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप पसरवणारी होती. कथुआ जिल्ह्यात Kathua.docxसुन्नी मुसलमान बकरवाल समाज शेकडो वर्षांपासून मेंढपाळ व्यवसायात आहे. ऋतू बदलेल तसा हा समाज आपला बाडबिस्तारा गुंडाळून स्थलांतर करत असतो. या समाजाला काश्मीर खोऱ्यातून हुसकावण्यासाठी एक मोठे कारस्थान रचले गेले. त्यात एका आठ वर्षांच्या चिमुरड्या मुलीला लक्ष्य करून त्याला हिंदू-मुस्लिम असा रंग दिला गेला.
एके दिवशी दैनंदिन कामानुसार बकरवाल समाजातील मुलगी जंगलात निर्जन ठिकाणी गुरं चरायला घेऊन गेली असताना तिचे अपहरण करण्यात आले. तिला गुंगी येणाऱ्या गोळ्या जबरदस्तीने देण्यात आल्या व तिच्यावर आठ जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला.
बलात्कार करणारे इतके नीच व नराधम वृत्तीचे होते की मंदिरातही या मुलीवर तीनवेळा बलात्कार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. एक सरकारी अधिकारी (सांझी राम-जो मुख्य आरोपी आहे) व दोन पोलिस या नीच कृत्यात सहभागी झाले व या प्रकरणाची अधिक वाच्यता होऊ नये म्हणून तिचा दगडाने ठेचून खून केला गेला.
या घटनेने तीन महिने जम्मू व काश्मीरचे राजकारण व समाजजीवन घुसळून काढले होते पण आरोपींना पकडले जात नव्हते. जेव्हा सर्वसामान्यांचा संताप अनावर झाला तेव्हा पोलिसांनी सर्व आरोपींना पकडून त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण अशी चार्जशीट दाखल होऊ नये म्हणून जम्मूमधील वकिलांचा एक गट भाजप कार्यकर्त्यांसह रस्त्यावर आला. एवढेच नव्हे तर बलात्कारांचा बचाव करण्यासाठी हिंदू एकता मंच जन्मास घातला गेला. आरोपींना न्यायालयात हजर करत असताना या झुंडशाहीने न्यायालयासमोर जय श्रीरामाच्या, भारतमातेच्या घोषणा दिल्या. तिरंगा फडकवला गेला. शिवाय बलात्काराचे समर्थन करणाऱ्यांनी पोलिसांनाच ते पक्षपाती व हिंदूविरोधी असल्याचा बेधडक आरोप केला.
सोमवारी या प्रकरणाचा निकाल येत असल्याने राज्य सरकारने राज्यात सुमारे हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता.
मूळ बातमी
COMMENTS