एलआयसीनंतर स्टील ऑथॉरिटीमधील ५ टक्के हिश्याची विक्री

एलआयसीनंतर स्टील ऑथॉरिटीमधील ५ टक्के हिश्याची विक्री

नवी दिल्ली : भारत पेट्रोलियम, भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) या सार्वजनिक कंपन्यांमधील आपला हिस्सा विकण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता केंद्र सरकारन

न्याय सूडाची जागा घेऊ शकत नाही : सरन्यायाधीश
६ वर्षे चाललेले एक शेतकरी आंदोलन!
सरकार विरुद्ध ट्विटर वादामागे सत्तेचे राजकारण

नवी दिल्ली : भारत पेट्रोलियम, भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) या सार्वजनिक कंपन्यांमधील आपला हिस्सा विकण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता केंद्र सरकारने स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया (सेल)मधील आपली ५ टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी दर्शवली आहे. या व्यवहारामुळे सरकारला १ हजार कोटी रु. मिळतील असा अंदाज आहे.

‘सेल’मधील पाच टक्के हिस्सेदारी विकण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेसमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट (दीपम) व पोलाद मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सिंगापूर व हाँगकाँगमध्ये रोडशो करणार आहेत. पण कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे हाँगकाँगमधील रोडशो रद्द करण्यात आला आहे.

सध्या केंद्र सरकारचा ‘सेल’मधील हिस्सा ७५ टक्के आहे. २०१४मध्ये सरकारने आपला हिस्सा विकला होता. त्यानंतर हा दुसरा प्रयत्न आहे. गेल्या शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात ‘सेल’चा समभाग ४८.६५ रुपयांना विकला गेला होता.

चालू वर्षांत विक्रीची शक्यता

यंदाच्या वित्तीय वर्षात सरकारचे ६५ हजार कोटी रु. गुंतवणुकीचे लक्ष्य असून सरकारने आजपर्यंत ३४ हजार कोटी रु. मिळवले आहेत. पुढील मार्चअखेर सरकारला अजून ३१ हजार कोटी रु.ची गरज आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0